पुतळाबाई भोसले

छ. शिवाजी महाराज यांची पत्नी From Wikipedia, the free encyclopedia

पुतळाबाई भोसले

पुतळाबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. पुतळाबाईंचा १५ एप्रिल १६५३ रोजी शिवाजी राजांंशी विवाह झाला. पुतळाबाई पालकर घराण्यातील होत्या. नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे चुलते होते. त्यांना मूल बाळ नव्हते.

जलद तथ्य महाराणी पुतळाबाई भोसले ...
महाराणी पुतळाबाई भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ १६७४ - १६८०
राजधानी रायगड
पूर्ण नाव पुतळाबाई शिवाजीराजे भोसले
पदव्या महाराणी
मृत्यू २७ जून १६८०
रायगड किल्ला, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी महाराणी सोयराबाई
उत्तराधिकारी महाराणी येसूबाई
पती छत्रपती शिवाजी महाराज
राजघराणे भोसले
चलन होन
बंद करा

महाराणी पुतळाबाई या एक प्रचंड निष्ठावंत राणीसाहेब होत्या. श्रीमंत पुतळाबाई राणीसाहेब यांचे महाराजांच्यावर खूप खूप मनापासून अतिशय अफाट प्रेम होते. राजे पंचतत्वात विलीन झाल्यानंतर पुतळाबाई राणीसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जोडे ( पादुका/ व्हान/चप्पल) उराशी/छातीशी कवटाळून महाराजांच्या चितेत प्रवेश केला आणि त्या मराठा इतिहासात सौभाग्यवती सती गेल्या. (संदर्भ श्रीमान योगी लेखन श्री रणजीत देसाई)

महाराजांच्यानंतर स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले. महाराजांच्या इच्छेप्रमाणे संभाजी राजांकडे त्यांनी स्वराज्याचा कारभार सुखरूप सोपवला. त्यांचा मृत्यू रायगडावर झाला.

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.