पिथोरागढ जिल्हा
भारतातील उत्तराखंडमधील जिल्हा From Wikipedia, the free encyclopedia
पिथोरागढ जिल्हा हा उत्तराखंडच्या १३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. पिथोरागढ जिल्हा उत्तराखंडच्या पूर्व भागात हिमालय पर्वतरांगेमध्ये स्थित असून त्याच्या पूर्वेस नेपाळ तर उत्तरेस चीनचा तिबेट प्रदेश आहेत. महाकाली नदीचा उगम पिथोरागढ जिल्ह्यातच होतो व ती भारत-नेपाळ सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते. कालापाणी प्रदेश व लिपुलेख हा हिमालयामधील घाट पिथोरागढ जिल्ह्यामध्येच आहेत. नेपाळ व चीन ह्या दोन्ही देशांच्या सीमा असल्यामुळे पिथोरागढ भारतासाठी एक महत्त्वाचा व संवेदनशील भूभाग आहे.
२०११ साली पिथोरागढ जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४.८ लाख होती. कुमाऊँनी ही हिंदीची एक बोली ह्या भागात वापरली जाते. पिथोरागढ हे येथील एक प्रमुख शहर व जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.