From Wikipedia, the free encyclopedia
पिक्सार अॅनिमेशन स्टुडिओज् (/ˈpɪksɑːr/)हा एक अमेरिकन संगणक अॅनिमेशन चित्रपटनिर्मिती स्टुडिओ आहे. त्याच्या गंभीर आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी संगणक अॅनिमेटेड फीचर फिल्म्ससाठी हा स्टुडिओ प्रसिद्ध आहे. सामान्यतः फक्त पिक्सार म्हणून ओळखला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पिक्सार अॅनिमेशन स्टुडिओ | |
---|---|
प्रसिद्ध कामे | टॉय स्टोरी(१,२,३),कार्स्(१,२),अ बग्स लाइफ, वाल-ई,ईत्यादी. |
पुरस्कार | १६ अॅकडॅमी,७ गोल्डन ग्लोब,३ ग्रामी, ईत्यादी. |
संकेतस्थळ पिक्सार.कॉम |
कॅलिफोर्नियाच्या एमरीविले येथे स्थित आहे आणि वॉल्ट डिस्ने कंपनीच्या मालकीच्या वॉल्ट डिस्ने स्टुडिओची उपकंपनी आहे.
या अॅनिमेशन स्टुडिओने जगभरात खुप नावलौकिक आणि पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये मु़ख्यता २६ अकॅडमी पुरस्कार ,३ ग्रॅमी पुरस्कार , ७ गोल्डन ग्लोब पुरस्कार यांचा समावेश आहे.
पिक्सारने आजपर्यंत १२ चित्रपटांची निर्मिती केली आहे. ज्याच्या निर्मितीची सुरुवात इ.स. १९९५ला टॉय स्टोरी या चित्रपटापासुन झाली.त्यानंनतर स्टुडिओने एकाहुन एक असे सरस चित्रपट तयार केले. यामधे इ.स. १९९८ मधील अ बग्स लाइफ , इ.स. १९९९ मधील टॉय स्टोरी २ , इ.स. २००१ मधील मॉन्स्टर्स इंक, इ.स. २००३ मधील फाइंडिंग नेमो, इ.स. २००४ मधील द इनक्रेडिबल्स, इ.स. २००६ मधे कार्स, इ.स. २००८ मधील वॉल-इ , इ.स. २००९ मधे अप , इ.स. २०१० मधे टॉय स्टोरी ३ आणि इ.स. २०११ मधील कार्स २ हे चित्रपट मुख्य आहेत. या पैकी इ.स. २०१० मधील टॉय स्टोरी ३ य चित्रपटाने आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज डॉलर इतकी कमाई केली आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.