देनपसार

From Wikipedia, the free encyclopedia

डेनपासार तथा कोट डेनपासार हे इंडोनेशियाच्या बाली प्रांताची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बाली बेटावरील हे शहर मोठे पर्यटनस्थळ आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,८८,४४५ आहे तर महानगराची लोकसंख्या २० लाखांपेक्षा अधिक आहे.

डेनपासारचे नाव बाली भाषेतील डेन (उत्तर) आणि पासार (बाजार) या दोन नावांची जोड आहे.[]

इतिहास

डेनपासार बाडुंग राज्याची राजधानी होते. इ.स. १९०६मध्ये नेदरलॅंड्सनी केलेल्या हल्ल्यात बाडुंग राज्याचा नाश झाला व डेनपासार डच आधिपत्यात आले. त्यावेळी डचांनी केलेल्या जाळपोळीत राजमहालासह शहराचा मोठा भाग नष्ट झाला.[]

संदर्भ आणि नोंदी

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.