दुर्गा खोटे
मराठी चित्रपट अभिनेत्री From Wikipedia, the free encyclopedia
दुर्गा खोटे (जानेवारी १४, इ.स. १९०५ - सप्टेंबर २२, इ.स. १९९१) या मराठी अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या.
दुर्गा खोटे | |
---|---|
![]() अमर ज्योती (इ.स. १९३६) चित्रपटात दुर्गा खोटे | |
जन्म |
जानेवारी १४, इ.स. १९०५ मुंबई, ब्रिटिश भारत |
मृत्यू |
सप्टेंबर २२, इ.स. १९९१ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | अयोध्येचा राजा |
इ.स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.

बालपण
दुर्गाबाई यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ साली झाला. दुर्गा यांना लहानपणी बानू असे म्हणत होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एका बहिणीचे नाव इंदू व दुसऱ्या बहिणीचे नाव शालू असे होते. कांदेवाडी या गावात दुर्गाबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा तेथे वाडा होता. तो वाडा लहान बानू यांना खूप आवडायचा. तेथील वातावरण अतिशय आनंदी होते. दुर्गा यांची काकू काकीबाई ह्यांनी सर्व पोरांचा सांभाळ केला. त्या खूप प्रेमळ होत्या. दुर्गाबाई यांच्या वडिलांचे पूर्ण नाव पांडुरंग शामराव लाड असे होते. दुर्गाबाई यांच्या आईचे नाव मंजुळाबाई असे होते.दुर्गाबाई यांचे वडील मुंबई येथे येऊन सॉलिसिटर झाले. दुर्गाबाईंचे वडील प्रेमळ होते व त्यांची विचारसरणी उदार होती.
शिक्षण
कॅथेड्रल या शाळेत दुर्गा यांचा प्रवेश झाला. तेथील सर्व शिक्षक युरोपिअन होते. तेथे बास्केटबॉल या खेळाच्या त्या लीडरही होत्या. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, इंग्रजी नाटके, कला, वक्तृत्व यांमध्ये त्या आघाडीवर होत्या.
चित्रपट
दुर्गा यांनी ‘फरेबी झाल’ हा त्यांच्या बहिणीने अभिनय नाकारल्यावर केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर ‘प्रभात’, ‘सौंगडी’ ह्या चित्रपटांमध्ये दुर्गाबाई यांनी काम केले. ‘पृथ्वीवल्लभ’ याही चित्रपटात दुर्गाबाई यांनी काम केले.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील दुर्गा खोटे चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.