From Wikipedia, the free encyclopedia
तंजावर मराठी ( तमिळ: தஞ்சாவூர் மராட்டி (लिप्यंतरः तंजावूर मराट्टि); रोमन लिपी: Thanjavur Marathi / Tanjore Marathi ) ही मराठी भाषेचीच एक बोली असून ती भारतातील तमिळनाडू ह्या राज्यात बोलली जाते. जवळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात. तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आजही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाच्या ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेचा प्रभाव ह्या भाषेवर जाणवतो.
उदाहरणासाठी काही वाक्यप्रयोगः
तंजावूर मराठी | महाराष्ट्री मराठी |
---|---|
नमश्कारऽ | नमस्कार |
कशा आहेतऽ? | कसे आहात? |
तुमचे नांमऽ कायऽ? | तुमचे नाव काय आहे? |
मजऽ नांमऽ .......... | माझे नाव .......... |
तुमी कोणऽ? | तुम्ही कोण? |
होये | हो |
बोरो | बरे |
नाही / नोहो | नाही / नको |
तुमाल् कायऽ पैजे? | तुम्हाला काय पाहिजे आहे? |
डावाह्पटीस | डाव्या बाजूस |
उजिवाह्पटीस | उजव्या बाजूस |
येजऽ मोऽल् केवडे? | ह्याची किंमत काय? |
काय मणिङ्गुणकोंतऽ | क्षमा करा |
चिंता कर्णुकोंतऽ | चिंता करू नका |
पुन्ना मिळ्मुणऽ | पुन्हा भेटूया |
लिंक | मजकूर |
---|---|
http://tanjavurmarathi.podomatic.com/ | तंजावूर मराठी भाषकांनी हाती घेतलेला भाषिक वैशिष्ट्ये ध्वनिमुद्रित करण्याचा प्रकल्प |
http://vishnughar.blogspot.in/ | दक्षिण भारतात बोलली जाणारी मराठी भाषा, तीमधील शब्द संग्रहित करण्याचा प्रकल्प |
http://vishnugharforum.blogspot.in/ | तंजावूर मराठी बोलीमध्ये लेखन करण्याचा प्रकल्प |
Seamless Wikipedia browsing. On steroids.