Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
जॉनी लिव्हर (ऑगस्ट १४, इ.स. १९५६:अमकम, प्रकाशम जिल्हा, आंध्र प्रदेश - ) हा बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता आहे.
जॉनी लिव्हर | |
---|---|
जॉनी लिव्हर | |
जन्म |
जॉनराव प्रकाशराव जनुमाला ७ जानेवारी १९५० कनगिरी आंध्र प्रदेश |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | व्यावसायिक चित्रपट |
वडील | प्रकाशराव |
आई | करुणाम्मा |
पत्नी | सुजाता |
अपत्ये | जेस्सी |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.imdb.com/name/nm0505323/bio |
याचे मूळ नाव जनार्दन राव असे आहे.
जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचेे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा हे मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे.
जॉनीचे वडील गिरणी कामगार होते. वडिलांचे मोठे भाऊ व त्यांचेेें कुटुंब अशी एकूण आठावर माणसे एका घरात राहायची. त्यांच्या परिसरात दाक्षिणात्यबहुल वातावरण होते. पण मराठी माणसेही भरपूर होती. सतत काहीना काही चालायचे. सण-वार असायचे, पूजा असायच्या, बारशी असायची व लग्नेही असायची. त्यामुळे कुठल्या न कुठल्या निमित्ताने सदैव लाऊडस्पीकरवर दाक्षिणात्य भाषांतील, हिंदी, मराठीतील गाणी चालू असायची तो काळ रेकॉर्ड डान्सचा होता. ध्वनिमुद्र्का लावून गाण्यावर मुले-मुली नाचायची. रात्री कार्यक्रम असायचे. कधी कधी रात्री रस्त्यावर मधोमध पडदा उभा करून चित्रपट दाखवला जाई व जॉनी लिव्हर आणि मंडळी एकत्र बसून तो पाहात असत. या वातावरणाचा जॉनीवर नकळत परिणाम घडला.
असे सारे ठीक सुरू असताना वडिलांचे दारूचे व्यसन वाढले व जॉनीच्या नशिबाचे चक्र फिरले. त्यांचे कुटुंब किंग्ज सर्कलच्या झोपडपट्टीत राहायला आले. जॉनी वडाळ्याच्या आंध्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधे तेलुगू माध्यमाच्या शाळेत शिकत होते. सात रुपये फी होती तीही देणे परवडत नव्हते. महिनाअखेरीस बाकावर उभे राहायचे किंवा वर्गाबाहेर जायचे. कधी कधी वेताच्या छड्या मिळायच्या.
त्या वयातच जॉनी लिव्हर यांना जबाबदारीची जाणीव झाली होती. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. त्यामुळे अर्थात रात्री घरी उशिरा पोचायचे. दुसऱ्या दिवशी शाळेत जायला उशीर होई. मग शिक्षक ओरडत. मग ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचा प्रयत्न करीत. वर्गात अभ्यासात यथातथाच होते. पण मनात आले तर काहीही करायचे. नेहमी पहिला येणाऱ्या मुलाने रुबाब दाखवला, तेव्हा जॉनीने त्याला पुढच्या सहामाहीत भरपूर अभ्यास करून वर्गात दुसरा येऊन दाखवले.
फीचे पैसे नसल्यानं जॉनीला अपमानास्पदरीत्या सातव्या वर्गात असतानाच शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी त्याने काहीही केले. देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. रोज दोन-तीन रुपये सुटायचे. त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ-तांदूळ, दोन आण्यांचे कांदे-बटाटे, मसाला घरी आणायचो, तेव्हाच घरी जेवण बनायचे
पुढे जॉनी बसस्टॅंडवर फेरीवाला म्हणून करू लागला. तो तेथे सिनेस्टार्सची नक्कल करत करत व्यवसाय करीत असे. वयाच्या सतराव्या वर्षी मी गल्लीतल्या गणपती उत्सवात पहिली जाहीर मिमिक्री केली. लोकांना ती खूप आवडली. तेव्हा तीस रुपये मिळाले. नंतर १८व्या वर्षी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. सातवी नापास मुलाला जे काम मिळणार तेच मिळाले- स्वीपरचे. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. त्यात एक काम होते रसायनांचे ड्रम उघडण्याचे व ते साफ करून ठेवण्याचे. पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले. रोजच तसेकेल्यावर जॉनीलाजाणवले की त्याच्या नकलांच्या आवाजावर चांगला परिणाम होतोय. वेगवेगळे आवाज काढायचो. एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनीने तऱ्हे-तऱ्हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनीला गेट्टुगेदरमध्ये संधी दिली. रंगभवनच्या त्याया संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीने सारे सभागृह दणाणून सोडले. एक हास्याभिनय केला. त्यानंतर जॉनी क्षणात लोकप्रिय झाला. मग त्याला कंपनीत जरा कमी कष्टाचे काम मिळू लागले
दुपारच्या वेळात नकला करून जॉनी मित्रांना हसवायच. एकदा तो कंपनीच्या आमच्या साहेब लोकांची नक्कल करत होते व कामगारमित्र तो साहेब कोण ते ओळखत होते. युनियनच्या लीडर, सुरेश भोसलेंनी ते पाहिले व ते म्हणाले, ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचे.’ त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात जॉनीने स्वतःची ओळख जॉनी लीव्हर अशी करून दिली व तेव्हापासून तेच त्यांचे व्यावसायिक नाव झाले.
यानंतर त्याने ऑर्केस्ट्रामध्ये काम केले. गाण्यांच्या मध्यंतरादरम्यान तो हास्याभिनय करीत असे. बाहेर कार्यक्रमांचे पैसे बऱ्यापैकी मिळू लागले म्हणून सात वर्षांनी जॉनीने नोकरी सोडली. त्यांच्या कार्यक्रमाची पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. नंतर तो कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरला.
अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जॉनीने पहिल्यांदा अमेरिका पाहिली. एकदा, १९८० मध्ये कल्याणजीभाईंच्या येथे कॅरम खेळत अस्ताना. त्यांच्याकडे एक दाक्षिणात्य निर्माता आला. त्याला हिंदी चित्रपटासाठी एक मिमिक्री कलाकार हवा होता. कल्याणजीभाईंनी जॉनीकडे बोट दाखवलं. काही कळायच्या आत, जॉनीच्या हातात मद्रासचे विमानाचे तिकीट आले. मग रिहर्सलच्या वेळी त्याने दिग्दर्शकाला साधीशी मिमिक्री करून दाखवली. तर दिग्दर्शक ‘व्हेरी गुड’ म्हणाले. ‘आता दाखवलं ते व्हेरी गुड काय. मग माझ्याकडचं चांगलं दाखवतोच,’ असा विचार करून जॉनीने दुसरी नक्कल दाखवली. ते खूप खूष झाले.
जॉनीची चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे ते मी मिमिक्रीच करायचे. त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात जॉनीने त्याचे रंग भरले. त्यानंतर लोकांनी त्याला अॅक्टिंग कलाकार म्हणून स्वीकारले. पुढे त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याला अनेक चित्रपटात कामे मिळाली. या चित्रपटांची संख्या ४००हून खूप अधिक आहे.
इ.स. १९९६-९७ पर्यंत जॉनी लिव्हर यांनी खूप कॉमेडी शोज केले. आणि मग १७ वर्षे विश्रांती घेऊन परत सुरू केले. मध्यंतरीच्या काळात अनेक पुस्तके वाचली, विनोदी आणि विनोदावरची पुस्तके वाचले, अनेक कलाकारांचे शोज पाहिले, टी.व्ही.वर अनेक चित्रपट पाहिले आणि मग परत चित्रपटांतही पुनरागमन केले.
या स्टॅण्ड अप कॉमेडीमध्ये एकच माणूस दहा जणांच्याही भूमिका करतो आणि त्याही कोणत्याही प्रॉपर्टीशिवाय. मराठीमध्ये पु.ल. देशपांडे आणि प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी तसे केले आहे. एक माईक व कलाकार. आविर्भावातून ओढणी दिसायला हवी, टोपी, तलवार जे काही आहे ते दिसायला हवे. बोलण्याच्या लकबीतून व्यक्तिरेखा बदलली हे कळायलाच हवे. तरच ती स्टॅण्ड अप कॉमेडी यशस्वी ठरते. जॉनी लिव्हर यांच्या स्टॅण्ड अप कॉमेडीला कोणतीही लिखित संहिता नसते. एक आराखडा बनलेला असतो आणि त्या आधारावर शो ऐन वेळी घडत जातो.
तसे जॉनी लिव्हरचे सर्वच शोज गाजत, पण त्यांच्या खास आठवणीतले दोन शोज म्हणजे मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमला झालेला होप-८६ हा आणि न्यू जर्सीतला शो. होप-८६मध्ये कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर.डी. बर्मन सहभागी झाले होते. ’नुक्कड’,”ये जो जिंदगी है’ या मालिकांतल्या कलाकारांची दोन आणि तिसऱ्या कोणाचे एक अशी तीन स्किट्स होती. जॉनीचा वापीला कार्यक्रम होता, पण तो न करताच तो ब्रेबॉर्न स्टेडियमला आला. स्वयंसेवकाचा बिल्ला लावून इकडे तिकडे फिरत असताना त्याला संयोजकांपैकी कुणीतरी पाहिले आणि स्टेजवर आमंत्रित केले. आनंदजींनी परवानगी दिल्यावर जॉनीने स्टेजवर जाऊन त्याला सुचेल ते केले. समोर दिलीप कुमारपासून ते अमिताभ बच्चनपर्यंतची फिल्म इंडस्ट्री बसली होती. सार्य़ंनी तो कार्यक्रम डोक्यावर घेतला. दुसरे दिवशी वर्तमानपत्रांत अमिताभ बच्चन आणि जॉनी लिव्हर यांच्या बातम्या झळकल्या.
न्यू जर्सीला असाच कार्यक्रम होता. ५०,००० लोक जमलेले. पुन्हा सारी फिल्म इंडस्ट्री हजर होती. आता नवे काय करू या विचारात असताना त्या वेळी जगभरात लोकप्रिय असणारे मायकेल जॅक्सन, अपाची इंडियन, टीना टर्नर आणि हॅमर यांच्या गायन-नृत्याच्या शैलीची आपण मिमिक्री करू या असा विचार जॉनीच्या डोक्यात आला. एका म्युझिशियनला बोलावून आपल्याला हव्या असलेल्या अपेक्षा सांगितल्या आणि या सर्वांना एकत्र आणेल अशा प्रकारचे संगीत वाजवायला सांगितले. या संगीतावर जॉनीने जो कार्यक्रम केला तो तुफान गाजला. लोकांनी अक्षरशः उभे राहून कौतुक केले.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.