जी.एन. जोशी (६ एप्रिल, इ.स. १९०९ - सप्टेंबर २२, १९९४) हे मराठीतले भावगीत गायक होते. रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत मराठीतले पहिले भावगीत समजले जाते.

जलद तथ्य गोविंद नारायण जोशी, आयुष्य ...
गोविंद नारायण जोशी
आयुष्य
जन्म ६ एप्रिल, इ.स. १९०९
जन्म स्थान भारत
मृत्यू सप्टेंबर २२, १९९४
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील नारायण जोशी
नातेवाईक गायक अभिजित ताटके (नातू)
संगीत साधना
गायन प्रकार भावगीत
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
विशेष कार्य मराठीचे आद्य भावगीतगायक
बंद करा

जी.एन. जोशी हे मुळात उच्चशिक्षित वकील होते. एचएमव्हीत रमाकांत रूपजी या वरिष्ठ अधिकाऱ्याने जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच करून टाकले. जी.एन. जोशी, रमाकांत रूपजी व वसंतराव कामेरकर या अधिकाऱ्यांच्या त्रयीने या भावगीतांच्या काळाला खरा आकार आणि आधार दिला. किती नव्या नव्या कलाकारांना त्यांनी हेरून प्रोत्साहन दिले व त्यांच्याकडून नेमकी रसिकांना आवडतील अशी गाणी करून घेतली त्याला तोडच नाही. शिवाय मराठी व हिंदी चित्रपटांच्या संगीताचे काम पुन्हा निराळे. अर्थात त्यात जोशी यांचा मुख्य वाटा नसला तरी स्टुडिओ उपलब्ध करून देणे, गायक व वादकांच्या रिहर्सलचे वेळापत्रक याचे ताळतंत्र पुन्हा त्यांनाच बघावे लागे. त्यात कलाकारांचा मूड सांभाळणे, त्यांना न दुखावणे ही मोठी जबाबदारी असायची. एचएमव्हीत जी.एन. जोशी यांनी हे ४० वर्षे काम लीलया सांभाळले. त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते. त्यामुळे जी.एन. जोशी हे एचएमव्हीतले दादा अधिकारी समजले जात.

मराठीतले पहिले भावगीत

‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणाऱ्या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत मेहेकरचे कवी ना.घ. देशपांडे यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून खासगी कार्यक्रमांतून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात रमाकांत रूपजी यांनी ते ऐकले व त्याची ध्वनिमुद्रिका करण्याचे ठरले. या शीळेच्या गाण्यामुळेच जोशी यांचा एचएमव्हीत (हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन कंपनीत) प्रवेश झाला व पुढे या शीळेनेच त्यांना वकिलीचे ज्ञान विसरण्यास भाग पाडले.

इ.स. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला.

जी.एन. जोशी यांनी गायलेली सुरुवातीची अन्य लोकप्रिय भावगीते

  • अशी घाल गळा मिठी बाळा
  • आकाशीच्या अंतराळी (कवी - अनिल)
  • आमराईत कोयल बोले (कवी - स.अ. शुक्ल)
  • आमुचे नाव आंसू ग
  • आलात ते कशाला, प्रिय जाहला कशाला
  • उघड दार उघड दार
  • एकटीच भटकत नदीकाठी
  • एकत्र गुंफून जीवित-धागे
  • कन्हैय्या दिसशी किती साधा (कवी - स.अ. शुक्ल)
  • काळ्या गढीच्या जुन्या
  • चकाके कोर चंद्राची (सहगायिका गांधारी ऊर्फ गंगूबाई हनगळ). कवी - स.अ. शुक्ल
  • चल रानात साजणा (कवी - स.अ. शुक्ल)
  • जादुगारिणी सखे साजणी (कवी - स.अ. शुक्ल)
  • झुळझुळ वाहे चंद्रभागा (कवी - स.अ. शुक्ल)
  • डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको (कवी ना.घ. देशपांडे).हे गाणे पुढे सुधीर फडके यांच्याही आवाजात ध्वनिमुद्रित झाले.
  • डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका (कवी भा.रा. तांबे. हे गाणे पुढे लता मंगेशकर यांनीही गायले. तेव्हा त्याचे संगीत वसंत प्रभू यांचे होते.
  • तू तिथे अन् मी इथे हा (सहगायिका गांधारी ऊर्फ गंगूबाई हनगळ). कवी - स.अ. शुक्ल
  • देव माझा तू कन्हैय्या (कवी - स.अ. शुक्ल)
  • नज सोडवे पदाला
  • नदीकिनारी, नदीकिनारी गं (कवी ना.घ. देशपांडे)
  • प्रिय जाहला कशाला (कवि.- वि.द. घाटे)
  • प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी
  • फार नको वाकू जरी
  • बहु असोत सुंदर
  • मंजूळ वच बोल सजणा (सहगायिका लीला लिमये). कवी - स.अ. शुक्ल
  • मध्यरात्रिला पडे तिच्या दारावरती थाप
  • माझ्या फुला उमल जरा (कवि.- वि.द. घाटे)
  • या तारका सूर बालिका (कवी - स.अ. शुक्ल)
  • रमला कुठे गं कान्हा (सहगायिका लीला लिमये)
  • रानारानांत गेली बाई शीळ
  • राया येता जवळ मनमोहना (कवी - स.अ. शुक्ल)
  • विसरून जा (कवी - अनिल)
  • क्षणभर भेट आपुली

जी.एन. जोशी यांनी लिहिलेले पुस्तक

  • स्वरगंगेच्या तीरी (आत्मचरित्र). या पुस्तकाचे Down Melody Lane नावाचे इंग्रजी भाषांतर Orient Longman या प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

जी. एन. जोशींच्या भावगीतांच्या कॉम्पॅक्ट डिस्क्स

जी.एन. जोशींच्या जन्म शताब्दी वर्षात म्हणजे २००९ साली, एचएमव्हीने जोशींना मानवंदना देण्यासाठी कंपनीने त्यांच्या आवाजातील इ.स. १९३५ सालापासूनच्या जुन्या ४३ भावगीतांच्या ‘स्वरगंगेच्या तीरी’ नावाचा दोन सीडींचा संच बाजारात आणला असून त्यात जोशी यांच्या आवाजातील फिरत, लयकारी, खटके-मुरके याचा आस्वाद रसिकांना घेता येतो.

जी.एन. जोशी यांच्यावरील माहितीपट

  • स्वरगंगेचा साधक (माहितीपट)

बाह्य दुवे


Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.