From Wikipedia, the free encyclopedia
ह्या जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी मध्ये अशा देशांचा समावेश केला गेला आहे जे जगातील इतर राष्ट्रांना अमान्य, अंशतः किंवा बहुतांशी मान्य आहेत.
नाव | कधीपासुन वादग्रस्त | मान्यता | संदर्भ |
---|---|---|---|
सोमालीलँड | १९९१ | जगातील सर्व देश सोमालीलॅंडला सोमालियाचा भाग मानतात. |
नाव | कधीपासुन वादग्रस्त | मान्यता | संदर्भ |
---|---|---|---|
नागोर्नो-काराबाख | १९९१ | जगातील सर्व देश नागोर्नो-काराबाखला अझरबैजानचा भाग मानतात. ट्रान्सनिस्ट्रिया,दक्षिण ओसेशिया व अबखाझिया या अमान्य देशांनी नागोर्नो-काराबाखला मान्यता दिली आहे. | |
ट्रान्सनिस्ट्रिया | १९९० | ट्रान्सनिस्ट्रियाचे स्वातंत्र्य फक्त अबखाझिया व दक्षिण ओसेशिया ह्या देशांना मान्य आहे. जगातील सर्व देश ट्रान्सनिस्ट्रियाला मोल्दोव्हाचा भाग मानतात. | [1] |
नाव | कधीपासून वादग्रस्त | मान्यता | संदर्भ |
---|---|---|---|
अबखाझिया | १९९२ | अबखाझियाला रशिया व निकाराग्वा ह्या राष्ट्रांकडून व ट्रान्सनिस्ट्रिया आणि दक्षिण ओसेशिया ह्या अमान्य देशांकडून मान्यता मिळाली आहे.[2] जगातील इतर सर्व देश अबखाझियाला जॉर्जियाचा भाग मानतात. | [3][4] |
तैवान | १९४९ | तैवानला व्हॅटिकन सिटी व २२ इतर देशांनी मान्यता दिलेली आहे. इतरांपैकी बहुतांश देशांचे तैवानशी अनधिकृत संबंध आहेत. | [5] |
कोसोव्हो | २००८ | कोसोव्होचे स्वातंत्र्य ६२ राष्ट्रांनी, तैवानने व अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्य केलेले आहे. जगातील इतर सर्व देश कोसोव्होला सर्बियाचा भाग मानतात.[6]. | [7] |
उत्तर सायप्रस | १९८३ | उत्तर सायप्रसचे स्वातंत्र्य केवळ तुर्कस्तान ह्या एकाच राष्ट्राला मान्य आहे. जगातील इतर सर्व देश उत्तर सायप्रसला सायप्रसचा भाग मानतात. | [8] |
पॅलेस्टाईन | १९८८ | पॅलेस्टाईनला ९३ राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे.[9] २२ इतर राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनचे दूतावास आहेत. इस्रायलला स्वतंत्र पॅलेस्टाईन देश अमान्य आहे. | [10] |
सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक | १९७६ | पश्चिम सहारावर मोरोक्कोने आपला हक्क सांगितला आहे व येथील बराचसा भाग व्यापलेला आहे. उरलेल्या भागात सहारवी अरब लोकशाही प्रजासत्ताकची सत्ता असून त्यानेही पूर्ण पश्चिम सहारावर आपला हक्क सांगितला आहे. पंचवीस राष्ट्रे आणि अरब लीग याला मोरोक्कोचा भाग समजतात. एकोणपन्नास देश याला सहारवी अरब लोकशाही प्रजासत्ताक हा स्वतंत्र देश समजतात तर उरलेले देश येथे कोणाचीच सत्ता असल्याचे मान्य करीत नाहीत. | [11] |
दक्षिण ओसेशिया | १९९१ | दक्षिण ओसेशियाला रशिया व निकाराग्वा ह्या राष्ट्रांकडून व ट्रान्सनिस्ट्रिया आणि अबखाझिया ह्या अमान्य देशांकडून मान्यता मिळाली आहे.[2] जगातील इतर सर्व देश दक्षिण ओसेशियाला जॉर्जियाचा भाग मानतात. | [4][12] |
नाव | कधीपासून वादग्रस्त | मान्यता | संदर्भ |
---|---|---|---|
आर्मेनिया | १९९२ | आर्मेनियाला पाकिस्तानने मान्यता दिलेली नाही | [13][14] |
चीन | १९४९ | चीनला तैवानने तसेच व्हॅटिकन सिटी व २२ इतर राष्ट्रांनी चीनला मान्यता दिलेली नाही. | [15] |
सायप्रस | १९७४ | सायप्रस देश तुर्कस्तान ह्या राष्टाला व उत्तर सायप्रसला अमान्य. हे दोन्ही देश सायप्रसला दक्षिण सायप्रसचा ग्रीक भाग असे संबोधतात. | [16][17][18] |
इस्रायल | १९४८ | इस्रायल खालील राष्ट्रांना अमान्य आहे: बहरैन[19], क्युबा, इंडोनेशिया, इराण[20], इराक[21], उत्तर कोरिया, कुवैत, लेबेनॉन, लिबिया[22], मलेशिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सुदान, सीरिया व येमेन. | [23][24] |
उत्तर कोरिया | १९४८ | उत्तर कोरिया देश जपान व दक्षिण कोरिया ह्या राष्ट्रांना मान्य नाही.[25] | [25][26][27] |
दक्षिण कोरिया | १९४८ | दक्षिण कोरिया देश उत्तर कोरियाला मान्य नाही. | [28][29] |
Seamless Wikipedia browsing. On steroids.