घटोत्कच

From Wikipedia, the free encyclopedia

घटोत्कच

घटोत्कच हा महाभारत युद्धात पांडवांच्या बाजूने लढलेला पराक्रमी योद्धा होता. तो भीम-हिडिंबा यांचा पुत्र होता.

घटोत्कचाची व्यक्तिरेखा दर्शवणारा महाभारतावरील जावी वायांग छायानाट्यातील चामड्याचा बाहुला.

महाभारतीय युद्धातील सहभाग

महाभारतीय युद्धाच्या १४ व्या दिवशी जयद्रथाचा वध झाल्यानंतर युद्ध आणखीनच घनघोर झाले. दोन्ही बाजूंनी वेळेचे ताळतंत्र न ठेवता रात्रीदेखील युद्ध चालू ठेवले. रात्रीच्या वेळात घटोत्कचाच्या मायावी शक्ती अधिक सबल झाल्या व त्याने कौरव सैन्यामध्ये जबरदस्त धुमाकूळ घातला. त्याच्या पराक्रमाने त्यादिवशी युद्धाचे पारडे पूर्णपणे पांडवांच्या बाजूने झुकले. त्याचा पराक्रम पाहून दुर्योधनाला युद्ध त्याच दिवशी संपते की काय, अशी भीती वाटू लागली व त्याने कर्णाला इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून घटोत्कचाचा वध करण्यास सुचवले. सुरुवातीस कर्ण तयार नव्हता. त्याला ती शक्ती अर्जुनावर वापरायची होती. परंतु दुर्योधनाच्या हट्टापुढे नाइलाज होऊन कर्णाने ती शक्ती घटोत्कचावर वापरली. त्याने घटोत्कच मृत्युमुखी पडला खरा, प‍रंतु मरतामरता आपले शरीर मोठे करून तो कौरवसेनेवर पडला आणि त्यामुळे आणखी मनुष्यहानी झाली.

घटोत्कचाला मारण्यासाठी कर्णाला इंद्राकडून मिळालेल्या अमोघ शक्तीचा वापर करावा लागल्यामुळे कृष्णाला हायसे वाटले. त्यामुळे पांडवांच्या व अर्जुनाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

घटोत्कचावरील मराठी पुस्तके

  • प्रलयंकर (श्रीकांत र. फाटक)

बाह्य दुवे

  • "महाभारतातील घटोत्कच-वध पर्वाचे इंग्लिश भाषांतर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.