गोरा कुंभार

१२६७-१० एप्रिल १३१७ From Wikipedia, the free encyclopedia

गोरा कुंभार
Remove ads
Remove ads

संत गोरा कुंभार (१२६७ - २० एप्रिल, १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेवसंत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा[]. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते.

Thumb
संत गोरा कुंभार यांचे तेर येथील समाधी मंदिर

त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत.

तेर नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. तेर येथील 'काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे तेर गावात माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली सातही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिले.

संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात. संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले, निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून,संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती.

Remove ads

अभंग

  1. अंतरीचे गुज बोलू ऐसे काही वण
  2. एकमेकामाजी भाव एकविध
  3. कवण स्तुति कवणिया वाचे
  4. काया वाचा मन एकविथ करी
  5. कासयासी बहू घालसी मळण
  6. केशवाच्या भेटी लागलेसे पीस
  7. कैसे बोलणे कैसे चालणे
  8. जो आवडी निर्गुणाचा संग धरिला
  9. जोहरियाचे पुढे ठेवियले रत्‍न
  10. देवा तुझा मी कुंभार
  11. नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा
  12. निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी
  13. निर्गुणांचे भेटी आलो सगुणासंगे
  14. ब्रह्म मूर्तिमंत जगी अवतरले
  15. मुकिया साखर चाखाया दिधल
  16. रोहिदासा शिवराईसाठी
  17. वंदावे कवानासी निंदावे कवनासी
  18. श्रवणे नयन जिव्हा शुद्ध करी
  19. सरितेचा ओघ सागरी आटला
  20. स्थूळ होते ते सूक्ष्म पै जहाल
Remove ads

चरित्रे व ग्रंथ

  • संत गोरा कुंभार (लेखक - अशोकजी परांजपे)
  • श्री विठ्ठलाच्या संत मेळाव्यात श्रीसंत गोरा कुंभार (लेखक - धोंडीराम दौलतराव कुंभार).
  • संत गोरा कुंभार (लेखक - निवृत्ती वडगांवकर)
  • संत गोरा कुंभार वाङमय दर्शन (लेखक - बाबुराव उपाध्ये)
  • गोरा कुंभार (लेखक - प्रा. बाळकृष्ण लळीत)
  • संत गोरा कुंभार (लेखक - महादेव कुंभार)
  • संत गोरा कुंभार (लेखक - मा.दा. देवकाते)
  • श्री गोरा कुंभार चरित्र (लेखक - वीणा र. गोसावी)
  • विलास राजे यांनी लिहिलेला संत गोरा कुंभार यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथ, ’जीवनमुक्त’ हा २५-५-२०१३ रोजी, डॉ. रामकृष्णदास लहिवतकर यांच्या हस्ते चिंचवडमध्ये प्रकाशित झाला.
  • म्हणे गोरा कुंभार (लेखक - वेदकुमार वेदालंकार)
  • गोरा कुंभार (लेखक - स.अ. शुक्ल)
Remove ads

चित्रपट

  • केएस गोपालकृष्णन यांनी १९४८ मध्ये 'चक्रधारी' नावाचा 'तेलुगू चित्रपट' दिग्दर्शित केला होता. यात व्ही. नागय्या आणि एस. वरलक्ष्मी यांनी भूमिका केल्या होत्या. तसेच याच नावाचा तमिळ चित्रपट देखील दिग्दर्शित केला होता. यात व्ही. नागय्या आणि पुष्पवल्ली यांनी भूमिका केल्या होत्या .
  • १९७४ कन्नड चित्रपट भक्त कुंभरा ज्यात राजकुमार अभिनीत होते .
  • व्ही. मधुसुधन राव यांनी १९७७ मध्ये चक्रधारी नावाचा आणखी एक तेलगू चित्रपट दिग्दर्शित केला. यात अक्किनेनी नागेश्वर राव यांनी भूमिका केली होती आणि हा १९७४ च्या कन्नड चित्रपट भक्त कुंबराचा रिमेक होता .
  • १९६० च्या दशकात कन्नड चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आणि त्याचे नाव गोरा कुंभरा असे ठेवण्यात आले.
  • १९६७ मराठी चित्रपट गोरा कुंभारा , ललिता पवार आणि इतरांनी अभिनय केला.
  • दिनेश रावल यांनी १९७८ मध्ये गुजराती चित्रपट भगत गोरा कुंभार दिग्दर्शित केला, ज्यात अरविंद त्रिवेदी, सरला येवलेकर, कल्पना दिवाण, श्रीकांत सोनी, महेश जोशी आणि इतर कलाकार होते.
  • संत गोरा कुंभार नावाचे मराठी नाटक होते. त्यात प्रसाद सावकार यांनी गोरोबांची भूमिका केली होती. लेखन अशोकजी परांजपे यांचे होते.
  • 'संत गोरा कुंभार' मराठी चित्रपट (दिग्दर्शक - राजा ठाकूर)

बाह्य दुवे

Loading content...
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads