गुलियेल्मो मार्कोनी (IPA इटालियन: ɡuʎˈʎɛlmo marˈkoːni)चा जन्म इटलीतील 'बोलोन्या' शहरात एप्रिल २५, १८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्‍सेल या शास्त्रज्ञाने विजेचा प्रवाह वातावरणात आहे, अशी कल्पना मांडली होती. या वीजप्रवाहाचे गुणधर्मही त्याने वर्णिले होते. पण बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

जलद तथ्य
गुलियेल्मो मार्कोनी
Thumb
जन्मएप्रिल २५, १८७४
पालाझ्झो मारेस्काल्ची, बोलोन्या, इटली
मृत्यूजुलै २०, १९३७
रोम, इटली
निवासस्थानइटली
युनायटेड किंग्डम
राष्ट्रीयत्वइटालियन
धर्मख्रिश्चन (रोमन कॅथॉलिक)
कार्यक्षेत्रविद्युत अभियांत्रिकी
कार्यसंस्थामार्कोनी वायरलेस टेलिग्राफ कंपनी
ख्यातीरेडिओ
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९०९)
वडीलज्युसेप मार्कोनी
आईऍनी जेम्सन-मार्कोनी
बंद करा

मार्कोनीला लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. हाइनरिक हर्ट्‌‌‌झचे लेखही त्याने वाचले होते. १८९५ मध्ये मार्कोनी हर्ट्‌‌झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोन्यातील मोठ्या वाड्यात काम करू लागला. तो आपला पहिला बिनतारी संदेश एक मैल लांब पाठवू शकण्यात यशस्वी झाला. जून २, १८९४ मध्ये इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून मार्कोनीचे पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले. सरकारी अधिकारी, पोस्टातील मान्यवर त्या वेळी उपस्थित होते.

सॅल्सबरीमध्ये दुसऱ्या प्रात्यक्षिकाला वायुदल व सेनादलातील बरेच अधिकारी आले. आता दोन मैलांवरून बिनतारी संदेश दहा मैलांपर्यंत पोचू शकत होता. हळूहळू मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचे जाळे सर्वत्र पसरत गेले. १९१४ मध्ये पहिले जागतिक युद्ध पुकारले गेले. मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचा इटालियन नौदल, वायुदलास फार उपयोग झाला. जगातील सर्वांत मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनीने उभारले. मार्कोनीला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व इतर अनेक पारितोषिके मिळाली.

बाह्यदुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.