From Wikipedia, the free encyclopedia
गवार किंवा गोवार (इंग्लिश: Cluster Beans) एक पलाश(Papilionaccea) कुळातली वेलवनस्पती आहे. हिच्या शेंगांची भाजी करतात. शास्त्रीय नांव : Cyamopsis psoralioides किंवा Cyamopsis tetragonoloba.
गोवारीचे झुडुप साधारणपणे एक मीटर उंचीचे असते. कांडावर बहुशः अंगासरसे केस असतात गवारीच्या शेंगाना कप्पे असतात. एकेक्या कप्प्यात ७ ते ११ बिया असतात. बिया बहुधा हिरव्या, क्वचित काळ्या रंगाच्या असतात. गवार द्विदल पिकांच्या श्रेणीत मोडते. उत्तर भारतात गवारीचे जास्त उत्पादन केले जाते. गवार शुष्कतेबाबत खूप सहनशील असल्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशात प्रामुख्याने हिची शेती केली जाते. गवारीच्या बियांच्या सालीपासून डिंक तयार केला जतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
★गवारीचा उपयोग:- १)बियांचा उपयोग ऊसळ बनविण्यासाठी किंवा डाळीसारखा होतो. २)डिंक बनविण्यासाठी. ३)यांच्या डिंकाचा ऊपयोग कापड व कागद उद्योगात रंग व रसायन,खाद्यपदार्थ बनविण्यासाठी, तेलऊद्योगत, सौंदर्यप्रसाधने व स्फोटक द्रव्यांच्या ऊत्पादनात केला जातो. ४)जनावरांना हिरवा चारा म्हणून. ५)हिरवळीचे खत म्हणून.
★सुधारित जाती:- १)पुसा नवबहार. २)पुसा सदाबहार. ३)पुसा मोसमी. ४)शरद बहार.
◆लागवडीचे अंतर:- १)सरिवरंब्यावर ४५×१५सें.मी. किंवा
३०×१५सें.मी.
१४ ते २४ किलो प्रती हेक्टर पुरेसे होते. खते :- ★ ३५किलो नत्र,६०किलो स्फुरद व
६० किलो पालाश.लागवडीच्या वेळी द्यावा
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.