गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज (६ जानेवारी १८६८, (उमरी) - २५ नोव्हेंबर १९६२, (पंढरपूर)) हे मराठी संत, कवी व कीर्तनकार होते.
जीवन
दास गणू महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणून ओळखतात.[1]
महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले.
१९६२ मध्ये दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला.
साईभक्ती
दासगणू महाराज साईबाबा यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फूर्तीनेच त्यांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभंगस्वरूप लेखनात साईबाबांचा उल्लेख सतत येतो. 'गणू म्हणे' ही त्यांची नाममुद्रा. ते साईबाबांनाचा ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या रूपात पाहत. दासगणू महाराज हेच साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष होते.
पुस्तके
दासगणू महाराजांच्या प्रमुख रचना अशा आहेत :
- श्री आऊबाई चरित्र
- ईशावास्य भावार्थ बोधिनी
- श्री गजानन विजय : या ग्रंथामधे श्री.गजाननमहाराजांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.
- गोदामाहात्म्य : ब्रह्मपुराणातील गौतमीमाहात्म्यावर आधारलेला, गोदावरी नदीचे व तिच्या तीरावरील तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य वर्णन करणारा एकतीस अध्यायांचा पद्य ग्रंथ. श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे ह्यांनी शके १९१९ मध्ये प्रकाशित केला आहे.
- भक्त लीलामृत
- भक्तिसारामृत,
- भाव दीपिका
- शंकराचार्य चरित्र
- शिर्डी माझे पंढरपूर (साईबाबांची आरती)
- संत कथामृत
- साई स्तवनमंजिरी
- गुरुचरित्र सारामृत ग्रंथ
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.