गजानन वाटवे
मराठी गायक, संगीतकार From Wikipedia, the free encyclopedia
गजानन वाटवे (जून ८, १९१७ - एप्रिल २, २००९) हे मराठी गायक, संगीतकार होते. पुण्याच्या चौकांचौकांतून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खऱ्या अर्थाने प्रसार केला.
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
गजानन जीवन वाटवे | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | जून ८, १९१७ |
जन्म स्थान | बेळगाव, भारत |
मृत्यू | एप्रिल २, २००९ |
मृत्यू स्थान | पुणे |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
वडील | जीवन वाटवे |
अपत्ये | मिलिंद वाटवे (पुत्र), मंजिरी चुणेकर (कन्या) |
संगीत साधना | |
गायन प्रकार | मराठी भावगीत गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गजानन वाटवे यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी
|
|
|
गजानन वाटवे यांनी संगीत दिलेली गाणी
|
|
|
संकीर्ण
- १९७१ साली वाटव्यांचे 'गगनी उगवला सायंतारा' नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
- ८ जून २०१६पासून सुरू होणाऱ्या वाटव्यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला वाटव्यांच्या विषयी मान्यवरांच्या आठवणी असलेली स्मरणिका प्रकाशित होणार आहे.
- ७ जून २०१६ रोजी, पुण्यात स्वरानंद प्रतिष्ठान आणि सिंफनी यांच्या तर्फे ‘निरांजनातील वात’ नावाची संगीत मैफिल झाली. या मैफिलीत अपर्णा संत, मंजिरी पुणेकर (वाटवे यांची कन्या) आणि मिलिंद वाटवे (वाटवे यांचे चिरंजीव), रवींद्र साठे आणि शेफाली कुलकर्णी यांनी वाटव्यांची गाणी गाऊन सादर केली.
- पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठान दरवर्षी भावगीतांसाठी आयुष्य खर्ची घतलेल्या एका संगीतकाराला गजानन वाटवे यांच्या नावाचा पुरस्कार देते. २०१७ साली हा पुरस्कार श्रीधर फडके यांना मिळाला.
- भावगीत गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची ‘गजानन वाटवे करंडक स्पर्धा’ दरवर्षी होते.
- पुण्यात १२ डिसेंबर १९६७ रोजी भावगीत गायकांचे संमेलन भरले होते, संमेलनाध्यक्ष गजानन वाटवे होते.
गजानन वाटवे भावगीत गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक
- इ.स. २०१० : अरुण दाते
- इ.स. २०११ : संकेत पुराणिक, रवींद्र कसबेकर, नकुल जोगदेव, प्रसाद जोशी, रोहन कामत, स्वप्नील परांजपे, ऋचा बोंद्रे आणि अश्विनी सराफ
- इ.स. २०१४ : सुजाता जोशी-अभ्यंकर (पुणे), अरुणा अनगळ (पुणे), नूपुरा निफाडकर (चिंचवड), अरविंद काडगावकर (पुणे) यांचा संघ
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.