Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CAN, आप्रविको: ZGGG) हा चीन देशाच्या क्वांगचौ शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१४ साली क्वांगचौ बैयून विमानतळ चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा (बीजिंगखालोखाल) तर जगातील १५व्या क्रमांकाचा विमानतळ होता.
क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ 广州白云国际机场 | |||
---|---|---|---|
आहसंवि: CAN – आप्रविको: ZGGG
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
कोण्या शहरास सेवा | क्वांगचौ, क्वांगतोंग | ||
हब | एर चायना चायना सदर्न एरलाइन्स षेंचेन एरलाइन्स फेडेक्स एक्सप्रेस चायना ईस्टर्न एरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ४९ फू / १५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 23°23′33″N 113°17′56″E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
01/19 | 3,600 | कॉंक्रीट | |
02L/20R | 3,800 | कॉंक्रीट | |
02R/20L | 3,800 | कॉंक्रीट | |
सांख्यिकी (२०१४) | |||
एकूण प्रवासी | ५४७,८०,३४६ | ||
मालवाहतूक (मेट्रिक टन) | 1,454,043.8 | ||
विमाने | 412,210 | ||
एर चायना, चायना सदर्न एरलाइन्स, षेंचेन एरलाइन्स व चायना ईस्टर्न एरलाइन्स ह्या चीनमधील प्रमुख विमान कंपन्यांचा हब असलेला क्वांगचौ बैयून ५ ऑगस्ट २००४ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आला. येथील जुन्या विमानतळाच्या ५ पट मोठ्या असलेल्या ह्या नव्या विमानतळाच्या बांधकामासाठी १,९८० कोटी रेन्मिन्बी इतका खर्च आला. हा विमानतळ क्वांगचौ शहरकेंद्रापासून २८ किलोमीटर (१७ मैल) उत्तरेस स्थित असून क्वांगचौ मेट्रोद्वारे तो शहरासोबत जोडला गेला आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.