From Wikipedia, the free encyclopedia
क्राइमियन युद्ध हे फ्रेंच साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य व सार्दिनियाचे राजतंत्र ह्यांच्या युतीने रशियन साम्राज्याविरुद्ध लढलेले १९व्या शतकामधील एक युद्ध होते. सध्या युक्रेनच्या अंमलाखाली असलेल्या क्राइमिया ह्या द्वीपकल्पावर प्रामुख्याने घडले गेलेले हे युद्ध ढासळत्या ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक भूभागांवर सत्ता प्रस्थापित करण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी एक होते.
दिनांक | ऑक्टोबर, १८५३ — फेब्रुवारी, १८५६ |
---|---|
स्थान | क्राइमिया,कॉकासस, बाल्कन, काळा समुद्र, पांढरा समुद्र, बाल्टिक समुद्र, अति पूर्व |
परिणती | दोस्तांचा विजय, पॅरिसचा तह |
युद्धमान पक्ष | |
---|---|
दुसरे फ्रेंच साम्राज्य ब्रिटिश साम्राज्य ओस्मानी साम्राज्य सार्दिनियाचे राजतंत्र |
रशियन साम्राज्य |
सेनापती | |
तिसरा नेपोलियन जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन ओमर पाशा |
पहिला निकोलस अलेक्झांडर दुसरा |
सैन्यबळ | |
१० लाख | ७.५ लाख |
हे युद्ध रेल्वे, टेलिग्राफ इत्यादी अनेक आधुनिक तंत्रांच्या वापरासाठी तसेच फ्लॉरेन्स नाइटिंगेल ह्या ब्रिटिश नर्सने केलेल्या कामासाठी स्मरणीय ठरले. पूर्व युरोपात सुमारे तीन वर्षे चाललेल्या ह्या युद्धात १८५६ साली रशियाने शरणागती पत्कारली.
Seamless Wikipedia browsing. On steroids.