क्रिकेट विश्वचषक, १९७९

From Wikipedia, the free encyclopedia

क्रिकेट विश्वचषक, १९७९

१९७९ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव प्रुडंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे दुसरे आयोजन होते. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये ९ जून ते २३ जून १९७९ च्या दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज तसेच श्रीलंकाकॅनडा या ८ संघांनी सहभाग घेतला. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले.

जलद तथ्य १९७९ क्रिकेट विश्वचषक (१९७९ प्रुडेंशियल कप), व्यवस्थापक ...
१९७९ क्रिकेट विश्वचषक (१९७९ प्रुडेंशियल कप)
Thumb
१९७५-१९८३ दरम्यानचा प्रुडेंशियल चषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६० षटके)
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान  इंग्लंड
विजेते  वेस्ट इंडीज (२ वेळा)
सहभाग
सामने १५
प्रेक्षक संख्या १,३२,००० (८,८०० प्रति सामना)
सर्वात जास्त धावा गॉर्डन ग्रिनीज (२५३)
सर्वात जास्त बळी माइक हेंड्रिक्स (१०)
१९७५ (आधी) (नंतर) १९८३
बंद करा

प्रुडेंशियल चषक वेस्ट इंडीज ने अंतिम सामन्यात इंग्लंडला हारवून जिंकला.

वेस्ट इंडीजच्या गॉर्डन ग्रीनिज याने सर्वाधिक धावा केल्या तर इंग्लंडच्या माइक हेंड्रिक्स याने सर्वाधिक गडी बाद केले.

स्पर्धा प्रकार

साखळी सामन्या साठी ४ संघांचा १ गट बनवण्यात आला ज्यात प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळेल व गटातील मुख्य दोन संघ दुसऱ्या गटातील प्रमुख दोन संघासोबत बाद फेरीतील सामने खेळेल

सहभागी देश

या स्पर्धेच्या पात्रता फेरी साठी पहा : १९७९ आय.सी.सी. चषक

अधिक माहिती देश/संघ, पात्रतेचा मार्ग ...
देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड यजमान, आयसीसी संपूर्ण सदस्य १९७५ उपांत्य फेरी (१९७५)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आयसीसी संपूर्ण सदस्य १९७५ उपविजेते (१९७५)
भारतचा ध्वज भारत १९७५ गट फेरी (१९७५)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १९७५ उपांत्य फेरी (१९७५)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १९७५ गट फेरी (१९७५)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १९७५ विजेते (१९७५)
कॅनडाचा ध्वज कॅनडा १९७९ आय.सी.सी. चषक पदार्पण पदार्पण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १९७५ गट फेरी (१९७५)
बंद करा

मैदान

अधिक माहिती लंडन, बर्मिंगहॅम ...
बंद करा

संघ

साखळी सामने

गट अ

अधिक माहिती खे, वि ...
संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२३.०६६बाद फेरीत बढती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३.६०२
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३.१६४स्पर्धेतून बाद
कॅनडाचा ध्वज कॅनडा १.६०६
बंद करा

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

९ जून १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१५९/९ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६०/४ (४७.१ षटके)

९ जून १९७९
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१३९/९ (६० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४०/२ (४०.१ षटके)




गट ब

अधिक माहिती खे, वि ...
संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०३.९२८बाद फेरीत बढती
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३.५५३
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.५५८स्पर्धेतून बाद
भारतचा ध्वज भारत ३.१२८
बंद करा

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद




१३ जून १९७९
धावफलक
भारत Flag of भारत
१८२ (५५.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८३/२ (५७ षटके)

१६ (१८) जून १९७९
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२३८/५ (६० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९१ (५४.१ षटके)

बाद फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२० जून - इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २२१  
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २१२  
 
२३ जून - इंग्लंड लॉर्ड्स
     इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९४
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २८६
२० जून - इंग्लंड ओव्हल
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २९३
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २५०  

उपांत्य फेरी

उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यू झीलंडमध्ये अटीतटीचा सामना झाला. पहिल्यांदा फलंदाजी करत इंग्लंडने ६० षटकात ८ गडी गमावून २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यू झीलंडने कडवी झुंज दिली परंतु न्यू झीलंडला ६० षटकात ९ गडी गमावून २१२ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यू झीलंडचा ९ धावांनी पराभव करत इंग्लंडने पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

वेस्ट इंडीजने दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अधिपत्य गाजवत पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.


अंतिम सामना

लॉर्ड्सवर २३ जून १९७९ रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात अंतिम सामना झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडीजच्या डावाची सुरुवात म्हणावी तसी सुलभ झाली नाही. गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स, अल्विन कालिचरण आणि कर्णधार क्लाइव्ह लॉईड हे लवकर बाद झाल्यामुळे वेस्ट इंडीजची सुरुवातीची स्थिती ९९/४ अशी होऊन बसली. परंतु त्यानंतर व्हिव्ह रिचर्ड्स याच्या १३८ धावांच्या शतकी खेळीमुळे वेस्ट इंडीजने ६० षटकांमध्ये २८६ धावांपर्यंत मजल मारली.

वेस्ट इंडीजच्या २८६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर माइक ब्रेअर्ली आणि जॉफ्री बॉयकॉट यांनी संथगतीने फलंदाजीला सुरुवात केली. ३८ षटकांपर्यंत इंग्लंड फक्त १२९ धावांपर्यंत पोहोचू शकला. सलामीवीर बाद झाल्यानंतर इंग्लंड १८३/२ वर असताना क्रिकेट इतिहासात केवळ ११ धावात उर्वरीत ८ गडी बाद झाले. इंग्लंडचा डाव १९४ धावात संपुष्टात आला. वेस्ट इंडीजने सलग दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला.

विक्रम

फलंदाजी

सर्वात जास्त धावा

  1. गॉर्डन ग्रिनीज (वेस्ट इंडीज) - २५३
  2. विवियन रिचर्ड्स (वेस्ट इंडीज) - २१७
  3. ग्रहम गुच (इंग्लंड) - २१०

गोलंदाजी

सर्वात जास्त बळी

  1. एम हेन्ड्रिक्स (इंग्लंड) - १०
  2. बी जे मॅक्केचिनी (न्यु झीलंड) - ९
  3. आसिफ इक्बाल (पाकिस्तान) - ९

अधिक माहिती .. Archived 2006-09-24 at the Wayback Machine.

बाह्य दुवे

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.