From Wikipedia, the free encyclopedia
डॉ. किशोर शांताबाई काळे (इ.स. १९७० - २१ फेब्रुवारी, इ.स. २००७) हे एक मराठी डॉक्टर व लेखक होते. काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.[1]
किशोर शांताबाई काळे |
---|
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा किशोर काळे यांनी वैद्यकशास्त्रातील एम.बी.बी.एस. ही पदवी मिळवली. कोल्हाट्याचे पोर या पुस्तकाचा शेवट मी १९९४साली एम.बी.बी.एस. झालो या वाक्याने होतो.
भटक्या तमासगीर कोल्हाटी समाजात जन्माला आलेल्या, व बाप कोण हे माहिती नसल्याने आईचे नाव लावणाऱ्या डॉ. किशोर काळे ह्यांचे अत्यंत गाजलेले कोल्हाट्याचे पोर हे आत्मचरित्र ग्रंथालीने नोव्हेंबर १९९४मध्ये प्रकाशित केले. त्याचा इंग्लिश अनुवाद पेंग्विन पब्लिकेशन्सने प्रकाशित केला. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर डॉ. काळे यांना त्यांच्या समाजाने बहिष्कृत केले. त्यांच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी कोल्हाटी समाजाच्या काही नेत्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली.[2] त्यांचे दुसरे पुस्तक मी डॉक्टर झालो हे "आपलं प्रकाशन" ने प्रकाशित केले आहे.
कोल्हाटी समाजातूनच पुढे आलेल्या प्रा. डॉ. सुषमा अंधारे त्यांच्या 'नातं मातीचं, नातं मातेचं!' या आत्मकथनपर लेखात ‘किशोर काळेंनी त्यांच्या साहित्यातून सामाजिक सुधारणा साधली जाण्यासाठी जो प्रहार केला त्यामुळे कोल्हाटी समाजाच्या सामाजिक सुधारणांसंबधाची पूर्ण भिंत कोसळली नाही तरीही सुषमा अंधारेंची स्वतःची लढाई सोपी झाली’ असा उल्लेख करतात. त्याच लेखात कोल्हाट्याचे पोर या पुस्तकाचे नाव कोल्हाटणीचे पोर असावयास हवे होते; त्यांच्या पुस्तकात कोल्हाटी समाजातील स्त्रीची व्यथा अधिक प्रकर्षाने मांडली जावयास हवी होती अशी स्त्रीवादी चिकित्साही त्या करतात.[3]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.