From Wikipedia, the free encyclopedia
कस्तुरी मृग (शास्त्रीय नाव: Moschus moschiferus मोशस मोशीफेरस ; इंग्लिश: Musk deer, मस्क डियर) हे कस्तुरीमृगाद्य कुळातील मोशस या एकमेव प्रजातीचे युग्मखुरी प्राणी आहेत. सारंगाद्य (सर्व्हिडी) कुळातील प्राण्यांपेक्षा - म्हणजे खऱ्या हरणांपेक्षा - कस्तुरी मृग अधिक पुरातन असून यांना सारंगाद्यांप्रमाणे शिंगे नसतात, तसेच स्तनाग्रांची एकच जोडी असते. तसेच यांना पित्ताशय, तसेच सुळ्यांसारखे दोन दात असतात; जे सारंगाद्यांमध्ये आढळत नाहीत. तसेच यांना कस्तुरी नावाचा तीव्र वासाचा स्राव स्रवणाऱ्या कस्तुरी ग्रंथी असतात.
कस्तुरीमृग | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
कस्तुरी मृगांची लांबी अंदाजे ८० ते १०० सेमी असते,त्यांची खांद्यापर्यन्तची अंदाजे ५० सेमी असते.त्यांचे लांब टोकदार मधले खुर व मोठे पार्श्व खुर हे बर्फाळ उतारावर व निसरड्या दगडांवर जम बसवण्यासाठी विकसित झाले आहेत.
कस्तुरी ग्रंथि नरांमध्ये, पोटाच्या त्वचेखाली, जननेंद्रिय व बेंबीच्यामध्ये असते. नुकतेच स्त्रवण झाल्यावरती त्याचा वास उग्र असतो, वाळल्यावरती त्याला कस्तुरीचा सुगंध प्राप्त होतो[1].
कस्तुरीमृग हा भारतातील उत्तराखंड राज्याचा राज्यपशु आहे.
कस्तुरीमृग व त्याच्या नाभीजवळील ग्रंथींमध्ये आढळणारी कस्तुरी यांच्या उपमा वापरून माणूस आणि अंतस्थ परमेश्वराच्या साक्षात्काराचे प्रतिपादन भारतीय उपखंडातल्या भक्तिमार्गी साहित्यात व तत्त्वज्ञानात अनेक वेळा केले आहे [2].
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.