पश्चिम रशियामधील नदी From Wikipedia, the free encyclopedia
ओका (रशियन: Ока́) ही मध्य रशियामधील एक प्रमुख नदी आहे. वोल्गाच्या मुख्य उपनद्यांपैकी एक असणारी ओका नदी रशियाच्या ओरियोल, तुला, कालुगा, मॉस्को, रायझन, व्लादिमिर व निज्नी नॉवगोरोद ह्या विभागांमधून वाहते व निज्नी नॉवगोरोद शहरामध्ये वोल्गाला मिळते. मॉस्को शहरामधून वाहणारी मोस्कवा नदी ही ओकाची एक उपनदी आहे.
ओका नदी Ока́ | |
---|---|
![]() निज्नी नॉवगोरोद शहरामधील ओकाचे पात्र | |
![]() ओका नदीच्या मार्गाचा नकाशा | |
मुख | वोल्गा नदी |
पाणलोट क्षेत्रामधील देश | रशिया |
लांबी | १,४९८.६ किमी (९३१.२ मैल) |
सरासरी प्रवाह | १,३०० घन मी/से (४६,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २,४५,००० |
ओरियोल, कालुगा, कोलोम्ना, रायझन व निज्नी नॉवगोरोद ही ओका नदीच्या काठांवर वसलेली प्रमुख शहरे आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.