Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de El Salvador) हा मध्य अमेरिकेतील सर्वांत लहान व सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश आहे. साल्व्हाडोरच्या पश्चिमेला होन्डुरास, उत्तर व पूर्वेला ग्वातेमाला तर दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. सान साल्व्हाडोर ही साल्व्हाडोरची राजधानी व सर्वात मोठे शहर असून सांता आना व सान मिगेल ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.
एल साल्व्हाडोर República de El Salvador एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "Dios, Unión, Libertad" (देव, एकता, स्वातंत्र्य) | |||||
राष्ट्रगीत: Himno Nacional de El Salvador | |||||
एल साल्व्हाडोरचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
सान साल्व्हाडोर | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | साल्व्हादोर सांचेझ सेरेन | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १५ सप्टेंबर १८२१ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २१,०४० किमी२ (१५३वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.४ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ६१,३४,००० (९७वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ३४१.५/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ४४.५७६ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ७,५४९ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.६५९ (मध्यम) (९० वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | अमेरिकन डॉलर | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य प्रमाणवेळ (यूटीसी−०६:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | SV | ||||
आंतरजाल प्रत्यय | .sv | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५०३ | ||||
१६व्या शतकाच्या सुरुवातीपासून स्पेनच्या अधिपत्याखाली असलेल्या साल्व्हाडोरला इ.स. १८२१ साली स्वातंत्र्य मिळाले. विसाव्या शतकाचा बराच काळ येथे लष्करी राजवट होती. सध्या येथे लोकशाही असून साल्व्हादोर सांचेझ सेरेन हा येथील विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. साल्व्हाडोरची अर्थव्यवस्था कमकूवत असून कॉफीची लागवड हा येथील प्रमुख उद्योग राहिला आहे.
एल साल्व्हाडोर हा देश मध्य अमेरिकेत आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ २१,०४० चौ.किमी.(८,१२३चौ.मैल) आहे. हा अमेरिका खंडातील सर्वात लहान देश आहे. या देशाचा ३२० चौ.किमी. भाग पाण्याने व्यापला आहे. या देशात अनेक लहान नद्या वाहतात. यांत गोआसकोरान, जिबोआ, तोरोला, पाझ, रिओ ग्रांडे दे सान मिगुएल या नद्यांचा समावेश होतो. लेंपा ही एकमेव मोठी नदी आहे. नद्यांसोबतच या देशात अनेक सरोवर आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.