एरबस ए३२० हा एरबस ह्या कंपनीने उत्पादित केलेला मध्यम पल्ल्याच्या, मध्यम क्षमतेच्या प्रवासी जेट विमानांचा एक समूह आहे. साधारणपणे १५० प्रवासी ५,४०० किमी (२,९०० समुद्री मैल) वाहून नेण्याची क्षमता या विमानात आहे. ह्या विमानाचे उत्पादन व अंतिम जोडणी फ्रान्सच्या तुलूझजर्मनीच्या हांबुर्ग येथील कारखान्यांमध्ये करण्यात येते. ए३२० विमान समूहामध्ये ए३१८, ए३१९ए३२१ ह्या बनावटींची विमाने देखील तयार करण्यात येतात.

जलद तथ्य एरबस ए-३२०, प्रकार ...
एरबस ए-३२०
Thumb

लुफ्तान्साच्या मालकीचे एरबस ए३२०-२११ विमान

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश फ्रान्स, जर्मनी, इटली
उत्पादक एरबस
रचनाकार एरबस
पहिले उड्डाण २२ फेब्रुवारी १९८७
समावेश १८ एप्रिल १९८८ (एर फ्रान्स)
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उत्पादित संख्या ६,३३१ (नोव्हेंबर २०१४ चा आकडा)
प्रति एककी किंमत ए३१८: US$71.9 (€53) दशलक्ष[1]
ए३१९: US$85.8 (€64) दशलक्ष[1]
ए३२०: US$93.9 (€70) दशलक्ष [1]
ए३२१: US$110.1 (€82) दशलक्ष[1]
उपप्रकार एरबस ए३१९
बंद करा

ए३२० समूहातील पहिले विमान मार्च १९८४ मध्ये बनवले गेले व एर फ्रान्सने हे विमान सर्वप्रथम मार्च १९८८ मध्ये वापरात आणले. आजच्या घडीला ए३२० समूहाची ७,५२१ विमाने जगभर वापरात आहेत तर ५,४७९ नव्या विमानांच्या पक्क्या ऑर्डरी एरबसला मिळाल्या आहेत. किफायती दरात प्रवासी विमानसेवा पुरवण्याचे लक्ष असणाऱ्या अनेक कंपन्यांसाठी ए३२० विमान आकर्षक ठरले आहे. आजच्या घडीला ए३२० समूहाची ३९४ विमाने आपल्या ताफ्यात बाळगणारी अमेरिकन एरलाइन्स ही ए३२० समूहाची जगातील सर्वाधिक वापरकर्ती कंपनी आहे. भारतीय विमानवाहतूक कंपनी इंडिगो आपल्या देशांतर्गत प्रवासी सेवेसाठी पूर्णपणे ए३२० रचनेची विमाने वापरते. बोइंग कंपनीचे ७३७ हे एरबस ए-३२० चे थेट स्पर्धक प्रकारचे विमान मानले जाते.

डिसेंबर २०१० मध्ये एरबसने ए३२० विमानाची ए३२०निओ (न्यू इंजिन ऑप्शन, New Engine Option) ही अद्ययावत शृंखला उद्धाटित केली. ए३२०निओ विमानांमध्ये नव्या व इंधनाची बचत करणाऱ्या इंजिनांचा वापर करण्यात आला असून ह्यामुळे १५ टक्के इंधनाची बचत होईल असा अंदाज एरबसने मांडला आहे. पहिले ए३२०निओ विमान २५ जानेवारी २०१६ रोजी लुफ्तान्साने वापरात आणले.

इतिहास

१९६० च्या दशकाच्या अखेरीस ए३०० हे विमान विकसित करत असतानाच बोइंग व डग्लस ह्या दोन अमेरिकन कंपन्यांसोबत स्पर्धा करण्यासाठी नव्या बनावटीच्या विमानसमूहाची संकल्पना एरबसने विचारात घेतली होती. पहिले ए३०० वापरात आणण्याअगोदरच एरबसच्या अभियंत्यांनी मोठ्या विमानाच्या ९ नव्या रचना तयार ठेवल्या होत्या. एरबसने १९७० च्या दशकात आपले संपूर्ण लक्ष मध्यम आकाराच्या व एक मर्गिका (aisle) असलेल्या विमानावर केंद्रित केले. ह्या प्रकारच्या विमान विक्रीवर बोइंग ७३७ व डग्लस डीसी-९ ह्या दोन बनावटींच्या विमानांचे संपूर्ण वर्चस्व होते.

जून १९७७ मध्ये जॉइंट युरोपियन ट्रान्सपोर्ट नावाचा नवा उपक्रम चालू करण्यात आला ज्यात एरबस तसेच तिच्या सहकारी कंपन्या सामील होत्या. ह्या उपक्रमातील सहभागी कंपन्यांनी १२५ ते १८० इतकी आसनक्षमता असलेल्या ३ रचना बनवल्या. कालांतराने हा उपक्रम संपूर्णपणे एरबसच्या स्वाधीन करण्यात आला व फेब्रुवारी १९८१ मध्ये त्याचे नाव ए३२० असे ठेवले गेले. एरबसने जगातील अनेक आघाडीच्या विमान कंपन्यांचे सल्ले घेऊन ए३२०ची रचना ठरवली. विमानाच्या उत्पादन व अंतिम जोडणीसाठी कारखाने उभे करण्यास फ्रान्स, युनायटेड किंग्डमपश्चिम जर्मनी हे देश उत्सुक होते. २ मार्च १९८४ मध्ये ह्या विमानाची अधिकृत घोषणा करतेवेळी एरबसकडे ९६ विमानांसाठी खरेदीमागण्या (ऑर्डरी) होत्या. लवकरच ब्रिटिश कॅलेडोनियन, सायप्रस एरवेझ, पॅन एम, नॉर्थवेस्ट एरलाइन्स इत्यादी अनेक कंपन्यांनी ह्या विमानासाठी ऑर्डर दिल्या.

१४ फेब्रुवारी १९८७ रोजी तत्कालीन फ्रेंच पंतप्रधान जाक शिराकवेल्सचा युवराज चार्ल्स तसेच वेल्सची युवराज्ञी डायना ह्यांच्या उपस्थितीत पहिले एरबस ए३२० विमान तुलूझ येथील कारखान्यामधून बनवून बाहेर आणन्यात आले व २२ फेब्रुवारी रोजी ह्या विमानाचे पहिले उड्डाण पार पडले. व्यावसायिक वापरात आणण्याअगोदर ५३० विविध उड्डाणांदरन्यान १२०० तास ह्या विमानाची चाचणी करण्यात आली.

एरबसने ह्यानंतर ए३२० समूहाची झपाट्याने वाढ केली व १९८९ साली १८५ आसनक्षमतेचे ए३२१ विमान, १९९३ साली १२४ आसनक्षमतेचे ए३१९ विमान तर १९९९ साली १०७ आसनक्षमतेचे ए३१८ विमान ही विविध विमाने बनवली.

सद्य चालक

Thumb
भारतीय इंडिगोचे एरबस ए३२० विमान
अधिक माहिती विमान कंपनी, ए३१८ ...
विमान कंपनी ए३१८ ए३१९ ए३२० ए३२०-निओ ए३२१ ए३२१-निओ एकूण
अमेरिकन एरलाइन्स१२५५०२१९३९४
चायना ईस्टर्न एरलाइन्स३६१७४७५२८५
ईझीजेट१४३१३४२७९
चायना सदर्न एरलाइन्स३०१२२९६२५५
एरएशिया१७८१२१९०
बंद करा

भारतीय चालक

अधिक माहिती विमान कंपनी, ए३१८ ...
विमान कंपनी ए३१८ ए३१९ ए३२० ए३२०-निओ ए३२१ ए३२१-निओ एकूण
इंडिगो११७२४१४१
एर इंडिया२२२४२०७५
इंडिगो१९२५
व्हिस्टारा१३१६
बंद करा

प्रतिस्पर्धी विमाने

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.