इक्ष्वाकु (देवनागरी लेखनभेद: इक्ष्वाकू ; संस्कृत: इक्ष्वाकु ;) हा वैदिक काळातील इक्ष्वाकु कुळाचा संस्थापक व अयोध्येचा पहिला राजा होता. हिंदू पौराणिक संदर्भांनुसार वैवस्वत मनूच्या सहा पुत्रांपैकी हा एक होता. त्याला सुदेवा नावाची पत्नी व शंभर पुत्र होते. त्याच्यापासून सुरू झालेल्या इक्ष्वाकु कुळात भगीरथ, दशरथ, राम यांच्यासारखे प्रभावशाली राजे निपजले.
परिवार
पद्म पुराणानुसार इक्ष्वाकुला सुदेवा नामक पत्नी होती[1]. भागवत, देवी भागवत, महाभारत इत्यादी ग्रंथांनुसार यास विकुक्षी, दण्डक, दशाश्व इत्यादी शंभर पुत्र होते. इक्ष्वाकूनंतर विकुक्षी अयोध्येचा राजा झाला; दण्डक हा दंडकारण्याचा राजा बनला, तर दशाश्वाने माहिष्मतीवर राज्य केले[1].
हे सुद्धा पहा
संदर्भ
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.