आलिया भट्ट

हिंदी चित्रपट अभिनेत्री From Wikipedia, the free encyclopedia

आलिया भट्ट

आलिया भट्ट (जन्म:१५ मार्च, १९९३) ही एक भारतीय वंशाची, ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलेली हिदी चित्रपट अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तिने टू स्टेट, शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपुर ॲंन्ड सन्स, ह्या चित्रपटात उल्लेखनीय काम केल आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

जलद तथ्य आलिया भट्ट, जन्म ...
आलिया भट्ट
Thumb
जन्म आलिया महेश भट्ट
१५ मार्च, १९९३ (1993-03-15) (वय: ३१)
मुंबई
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र अभिनेत्री, मॉडेल
कारकीर्दीचा काळ इ.स. २०१२ - चालू
भाषा हिंदी
पुरस्कार फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
वडील महेश भट्ट
आई सोनी राजदान
पती
नातेवाईक पूजा भट्ट (सावत्र बहीण)
बंद करा

जीवन

Thumb

आलिया भट्टचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी मुंबईमध्ये भारतीय चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांच्या भट्ट कुटुंबात झाला होता. तिचे वडील गुजराती वंशाचे आहेत आणि तिची आई काश्मिरी पंडित आणि जर्मन वंशाची आहे.[] तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. तिला एक मोठी बहीण, शाहीन, पूजा भट्ट आणि राहुल भट्ट अशी दोन सावत्र भावंडे आहेत. अभिनेता इमरान हाश्मी आणि दिग्दर्शक मोहित सूरी हे तिचे माहेरचे चुलत भाऊ अथवा बहीण असून निर्माता मुकेश भट्ट तिचे काका आहेत. आलियाचे शिक्षण जमनाबाई नरसी शाळेत झाले.[]

वैयक्तिक माहिती

२०१८ मध्ये, आलियाने ब्रह्मास्त्र (२०२२) मधील तिचा सहकलाकार अभिनेता रणबीर कपूर ला डेट करण्यास सुरुवात केली. तिने १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत पारंपारिक समारंभात त्याच्याशी लग्न केले.[][][]

चित्रपट कारकीर्द

अधिक माहिती वर्ष, चित्रपट ...
वर्ष चित्रपट रोल हिरो संदर्भ
१९९९ संघर्ष रीत बालकलाकार
२०१२ स्टुडन्ट ऑफ द इयर शनाया वरुण धवन
२०१४ हायवे वीरा रणदीप हूडा
२०१४ टू स्टेट्स अनन्या अर्जुन कपुर
२०१५ शानदार आलिया शाहिद कपुर
२०१५ हम्पटी शर्मा की दुल्हनीया काव्या वरुण धवन
२०१६ कपूर अँड सन्स टिया सिद्दार्थ मल्होत्रा
२०१६ उडता पंजाब बौरिया/मेरी शाहिद कपूर
२०१६ ऐ दिल है मुश्किल डीजे कोणीही नाही
२०१६ डियर जिंदगी कायरा शाहरुख खान
२०१७ बद्रीनाथ की दुल्हनिया वैदेही वरुण धवन
२०१८ राझी सहमत विकी कौशल
२०१९ गली बॉय सफिना रणवीर सिंग
२०१९ कलंक रुप वरुण धवन
२०१९ स्टुडंट ऑफ द इयर २ आलिया भट कोणीही नाही []
२०२० सडक २ आर्या आदित्य रॉय कपूर
२०२२ गंगुबाई काठियावाडी गंगुबाई शंतनू महेश्वरी []
२०२२ आरआरआर सीता राम चरण []
२०२२ ब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा ईशा रणबीर कपूर []
बंद करा

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.