रावसाहेब रामराव पाटील
R R Patil (Aaba) From Wikipedia, the free encyclopedia
रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर. आर. पाटील (१६ ऑगस्ट, १९५७; आंजणी (तासगांव) - १६ फेब्रुवारी, २०१५; मुंबई) हे महाराष्ट्रातील राजकारणी होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य, महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते. ते लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध होते[ संदर्भ हवा ]. ते इ.स. १९९० पासून ते २०१५ पर्यंत सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट १६, इ.स. १९५७ तासगाव | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | फेब्रुवारी १६, इ.स. २०१५ Lilavati Hospital and Research Centre | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
नियोक्ता | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद | |||
वैवाहिक जोडीदार | |||
|
२६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्यानंतर पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांनंतर बेजबाबदार वक्तव्यांसाठी आर.आर. पाटील हे टीकेचे लक्ष्य बनले होते. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला [१].
प्राथमिक आयुष्य
"आबा" या नावाने प्रसिद्ध असलेले आर.आर. पाटील यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ रोजी महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील आंजणी (तासगांव) या गावात झाला. वडील गावप्रमुख असूनही त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. "कमवा आणि शिका" या सरकारी योजनेअंतर्गत त्यांनी आपले बहुतांश शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सांगलीच्या शांतीनिकेतन कॉलेजमधून बीए आणि एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
मृत्यू
तोंडाच्या कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर पाटील यांचे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे निधन झाले. पाटील यांच्यावरील प्राथमिक उपचारानंतर त्यांच्यात सुधारणा झाल्याचे दिसून आले आणि जानेवारी २०१५ मध्ये त्यांना लाइफ सपोर्ट काढून घेण्यात आला.[२][३] परंतु १६ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. १७ फेब्रुवारी २०१५ रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसरातील अंजनी गावात पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.[४]
संदर्भ आणि नोंदी
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.