Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
आइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ आहे. रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. यापेक्षा लहान दुसरे गाव अकुरेरी (Akureiri) आहे. हे उत्तरेकडे आहे. येथे प्रमुख आकर्षण असे गरम पाण्याचे झरे हे रेकयाविकपासून २० मैलावर आहेत.
आइसलॅंड Lýðveldið Ísland Republic of Iceland आइसलंडचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
आइसलॅंडचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
रेयक्यविक | ||||
अधिकृत भाषा | आइसलंडिक | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १ फेब्रुवारी १९०४ | ||||
- प्रजासत्ताक दिन | १७ जून १९४४ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १,०३,००० किमी२ (१०७वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | २.७ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ३,१९,७५६ (१७२वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ३.२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १२.६६४ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
राष्ट्रीय चलन | आइसलॅंडिक क्रोना | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | IS | ||||
आंतरजाल प्रत्यय | .is | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +354 | ||||
आकाश बहुतेक वेळा ढगाळ असते. हा देश अत्यंत उत्तरेला असला तरीही अटलांटिक महासागरातील प्रभावशाली व कोमट खाडी प्रवाहामुळे आइसलंडमधील हवामान तुलनेत उबदार राहिले आहे.
ऐयाफ्यथ्लायोकुथ्ल (Eyjafjallajokull) नावाचा ज्वालामुखी येथे आहे. आइसलंडमध्ये अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत.
शेवटचे हिमयुगाचे अखेरचे अवशेष अजूनहि आइसलंडमध्ये शिल्लक आहेत. थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे नॉर्वेच्या राजापासून स्वतःची सुटका करू पाहणाऱ्या आणि शेती आणि पशुपालनासाठी नव्या जागा शोधणाऱ्या वायकिंग लोकांनी ९व्या शतकात प्रवेश केला. इ.स. १२६२ साली नॉर्वेचे राज्य आइसलॅंड वर सुरू झाले. कालान्तराने नॉर्वेची जागा डेन्मार्कने घेतली आणि डॅनिश सत्तेखाली आइसलंड इ.स. १९४४ सालापर्यंत राहिला. इ.स. १९४४ साली परस्परसंमतीने आइसलंड स्वतंत्र देश झाला. या घटनेची घोषणा थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे करण्यात आली होती. रेकयाविक शहरामध्ये आइसलंड देशाचे राष्ट्रीय संग्रहालय आहे.
लेइफ एरिकसन हा प्रवासी कोलंबसच्या पूर्वी ५०० वर्षे हा आइसलंडमधून निघून सध्याच्या कॅनडाच्या न्यू फाईण्डलंड आणि लॅब्राडोर प्रान्ताच्या उत्तरेस विनलंड येथे उतरला आणि अमेरिकेतील पहिली युरोपीय वसाहत त्याने तेथे बांधली असे आता मानतात.
आथक्रिमुर (इ.स १६१४- १६७४) (Hallgrímur Pétursson) हा आइसलंडचा सर्वात प्रख्यात कवी आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.