From Wikipedia, the free encyclopedia
अतुल्य भारत (English: Incredible India) आंतरराष्ट्रीय पर्यटन मोहिमेचे नाव आहे जी २००२ पासून भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने राबवली आहे. "अतुल्य भारत" या शीर्षकाची अधिकृतपणे २००२ पासून जाहिरात करण्यात आली.[1][2]
१९७२ मध्ये सुनील दत्तने लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून भारताला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू केली.[3] मंत्रालयाने घोषणा म्हणून "अतुल्य भारत" हे शब्द स्वीकारला. २००२ पूर्वी, भारत सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी धोरणे नियमितपणे तयार केली आणि माहितीपत्रके पण तयार केली होती. तथापि, याने पर्यटनाला एकत्रित पद्धतीने पाठिंबा दर्शविला नव्हता. २००२ मध्ये, पर्यटन मंत्रालयाने पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नात अधिक व्यावसायिकता आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. हुशार प्रवाशांना निवडीचे ठिकाण म्हणून भारताला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यात एकात्मिक संप्रेषणाची रणनीती तयार केली गेली.
या मोहिमेमध्ये योग, अध्यात्म इत्यादी भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे विविध पैलू दाखवून भारताला एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून दर्शविले गेले. ही मोहीम जागतिक स्तरावर आयोजित केली गेली आणि पर्यटन उद्योग निरीक्षक आणि प्रवाशांकडून त्यांचे कौतुक केले गेले. तथापि, मोहिमेवर काही घटकांकडून टीका पण झाली. काही निरीक्षकांना असे वाटले की भारतातील अनेक पैलू जे सरासरी पर्यटकांना आकर्षक वाटतील ते झाळकवण्यात अयशस्वी ठरले आहेत.[4]
२००८ मध्ये, पर्यटन मंत्रालयाने स्थानिक पर्यटकांना परदेशी पर्यटकांशी वागताना चांगल्या वागणुकीविषयी आणि शिष्टाचाराविषयी शिक्षित करण्यासाठी लक्ष्य दिले. भारतीय अभिनेता आमिर खानला “अतिथिदेवो भव:” नावाच्या मोहिमेस पाठिंबा देण्याचे काम दिले. पर्यटनाच्या परिणामाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि स्थानिक लोकसंख्येला भारताचा वारसा, संस्कृती, स्वच्छता आणि पाहुणचार याविषयी संवेदनशील बनवणे हा हेतू होता. पर्यटकांप्रती जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा आणि परदेशी पर्यटकांचा भारताविषयीचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला गेला.[5]
२०१५ मध्ये, आमिर खान यांच्या देशातील कथित असहिष्णुतेबद्दलच्या टिप्पण्यांमुळे वाद निर्माण झाला होता.[6] पुढे अतुल्य भारताचे नवीन ब्रॅंड अॅम्बेसेडर स्वतः नरेंद्र मोदी झाले.[7] २०१७ मध्ये, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची नवीन ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली.
मार्च २००६ मध्ये व्हिसा आशिया पॅसिफिकने जाहीर केलेल्या खर्चाच्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या खर्चाच्या बाबतीत भारत हा आशिया-पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. २००५ च्या चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी ३७२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे. २००४ च्या चौथ्या तिमाहीपेक्षा ही २५% जास्त होती.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.