२०१३ इंडियन प्रीमियर लीग
From Wikipedia, the free encyclopedia
२०१३ इंडियन प्रीमियर लीग ही २०१३ साली भारतात झालेली क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेच्या हंगामाचे लघुनाव आयपीएल ६ किंवा आयपीएल २०१३ असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळने २००७ मध्ये सुरुवात केल्या नंतरचा हा सहावा हंगाम होता. याचा उद्घाटन सोहळा सॉल्ट लेक मैदान, कोलकाता येथे झाला. स्पर्धा ३ एप्रिल ते २६ मे दरम्यान खेळवली गेली. डेक्कन चार्जर्स या संघाऐवजी सनरायझर्स हैदराबाद हा संघ या हंगामात खेळला. यासह ९ संघ स्पर्धेत सहभागी झाले. मुख्य पुरस्कर्त्यांच्या स्वरूपात पेप्सिको प्रथमच या सत्रात सहभागी झाले[1].
जलद तथ्य २०१३ इंडियन प्रीमियर लीग, व्यवस्थापक ...
२०१३ इंडियन प्रीमियर लीग | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | बीसीसीआय | ||
क्रिकेट प्रकार | २०-२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि प्ले ऑफ | ||
यजमान | भारत | ||
विजेते | मुंबई इंडियन्स (१ वेळा) | ||
सहभाग | ९ | ||
सामने | ७६ | ||
सर्वात जास्त धावा | मायकेल हसी (७३३) | ||
सर्वात जास्त बळी | ड्वेन ब्राव्हो (३२) | ||
अधिकृत संकेतस्थळ | www.iplt20.com | ||
|
बंद करा