२०११ ए.एफ.सी. आशिया चषक
From Wikipedia, the free encyclopedia
२०११ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची १५वी आवृत्ती कतार देशाच्या दोहा व अल रय्यान ह्या शहरांमध्ये ७ ते २९ जानेवारी इ.स. २०११ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून जपानने ही स्पर्धा विक्रमी चौथ्या वेळेस जिंकली.
जलद तथ्य स्पर्धा माहिती, यजमान देश ...
स्पर्धा माहिती | |
---|---|
यजमान देश | कतार |
तारखा | ७ जानेवारी – २९ जानेवारी |
स्थळ | ५ (२ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | जपान (४ वेळा) |
उपविजेता | ऑस्ट्रेलिया |
इतर माहिती | |
एकूण सामने | ३२ |
एकूण गोल | ९० (२.८१ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ४,०५,३६१ (१२,६६८ प्रति सामना) |
← २००७ २०१५ → | |
बंद करा