From Wikipedia, the free encyclopedia
एरो कॅरिबियन फ्लाइट ८८३ हे एरो कॅरिबीयन या विमानसेवेचे विमान नोव्हेंबर ४ इ.स. २०१० रोजी दुर्घटनाग्रस्त होउन त्यातील सर्व, ६१ प्रवासी व चालकदलाचे ७ सदस्य यांचा मृत्यू झाला. ही हैती येथील पोर्ट औ प्रिन्स ते सेंटियागो डि क्युबा मार्गे क्युबामधील हवाना येथे जाणारी नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा होती.उड्डाणादरम्यान एटीआर-७२-२१२ प्रकारचे हे विमान सेंट्रल क्युबन प्रॉव्हींस क्युबा मध्ये दुर्घटनाग्रस्त झाले.या विमानात असणारे सर्व,७ चालकदल सदस्यासहीत ६१ प्रवासी ठार झालेत.एटीआर-७२ या जातीच्या विमानांच्या अपघातापैकी हा सर्वात वाईट, तर आजवर क्युबामध्ये झालेल्या विमान अपघातांमध्ये तीसऱ्या क्रमाचा वाईट अपघात आहे.
सी.यु.-टी१५४९, क्रॅश केलेले विमान. | |
अपघात सारांश | |
---|---|
तारीख | नोव्हेंबर ४, २०१० |
प्रकार | अन्वेषणाधीन |
स्थळ |
21°44′39″N 79°28′16″W |
प्रवासी | ६१ |
कर्मचारी | ७ |
जखमी | ० |
मृत्यू | ६८ (सगळे) |
बचावले | ० |
विमान प्रकार | ए.टी.आर. ७२-२१२ |
वाहतूक कंपनी | एरो कॅरिबियन |
विमानाचा शेपूटक्रमांक | सी.यु.-टी१५४९ |
पासून | तूसैं लूव्हर्चर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पोर्ट औ प्रिन्स, हैती |
शेवट | होजे मार्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हवाना, क्युबा |
सीयु-टी१५४९ म्हणुन नोंदविलेले एटीआर-७२ जातीचे हे विमान[1] एरो कॅरिबियनमध्ये ऑक्टोबर २००६पासुन कार्यरत होते.[2] हे विमान 'कॉन्टीनेन्टल एक्सप्रेस'या विमानकंपनीने १९९५मध्ये विकत घेतले होते. एरो कॅरिबीयन ही विमानसेवा कंपनी त्यास २००६ मध्ये विकत घेणारी त्याची तिसरी मालक होती.. उत्पादकानुसार या विमानाने सुमारे २५,००० विमानोड्डाणतासात ३४,५०० उड्डाणे केली होती.[1] एरो कॅरिबीयन क्युबाच्या सरकारच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे.[3]
हे विमान हैती येथील पोर्ट औ प्रिन्स[4] येथुन निघाले. ते सेंटियागो डि क्युबा मार्गे क्युबामधील हवाना येथे जाण्यासाठी दुपारी सुमारे ४:५०ला (स्थानिक वेळ)(20:50-आंतरराष्ट्रीय वेळ).[5]ला निघाले.'हरिकेन टॉमस' या नावाच्या वादळाच्या येण्याच्या संभाव्य सुचनेमुळे बंद करण्यापूर्वी,सेंटियागो डि क्युबा येथील विमानतळावरून निघणारे, त्यादिवशीचे ते शेवटचे विमान होते.[6]
अपघातापूर्वी आणीबाणीचा संदेश देउन, हवानाच्या आग्नेय दिशेस,३३६ कि.मी.अंतरावर असणाऱ्या,ग्वासीमल या शहराजवळ,सुमारे ५:४२ला ते जमिनीवर धडकले.[5] एका प्रत्यक्षदर्शीनुसार,या विमानाने दाट झाडी असलेल्या ठिकाणी खाली पडण्यापूर्वी,अनेक वेड्यावाकड्या हालचाली केल्यात.[1] ग्वासीमल येथील आरोग्यसेवेस जखमींवर उपचारासाठी सतर्कतेची सुचना देण्यात आली होती, परंतु, मध्यरात्रीनंतर,अपघातात कोणीही वाचु न शकल्यामुळे, ती सुचना परत घेण्यात आली.[1] एटीआर-७२ या जातीच्या विमानांच्या अपघातापैकी हा सर्वात वाईट, तर आजवर क्युबामध्ये झालेल्या विमान अपघातांमध्ये तीसऱ्या क्रमाचा वाईट अपघात आहे.[2] सन १९८९ मध्ये, ३ सप्टेंबरला क्युबाना डि एव्हीयाशनच्या एका विमानापघातानंतर, १७१ व्यक्ति ठार झाल्या होत्या,[7], व २७ मे १९७७ला आणखी एका अपघातात,६९ व्यक्ति दगावल्या होत्या.[8].
बचावदलास अपघातस्थळी पोचण्यास, मार्गातील दाट झाडी बुलडोझरने रातोरात साफ करावी लागली.अधिकाऱ्यांनी अपघातस्थळास गराडा घातला व वृत्तसंकलकांना तेथे जाण्यास मज्जाव केला.विमान कोसळण्याने व स्फोटामुळे पूर्णपणे नष्ट झाले होते व प्रवाश्यांचे देह वाईटरित्या जळले होते.अपघाताच्या अनेक तासानंतरही विमानाचे अवशेष जळत होते.[9] सापडलेले मृतदेह हे क्युबाच्या न्यायवैद्यक संस्थेत ओळखण्यासाठी पाठविले जाणार आहेत.[1]. दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबरला, बचावदलाने फ्लाइट डाटा व कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर सापडविला.तो अन्वेषकांना सोपविण्यात आला.त्याने हे कळु शकेल कि,दोन टर्बो इंजिने असलेले हे विमान उड्डाणादरम्यान आकाशातुन कां कोसळले व ज्वालांच्या भक्षस्थानी पडले.[1].
या विमानातील चालकदल व प्रवासी वेगवेगळ्या देशांचे होते.
'इंस्टिट्युटो डि एरोनॉटिका सिव्हिल डि क्युबा' ही क्युबामधील विमान अपघातांचे अन्वेषण करणारी संस्था आहे.एटीआर विमान कंपनी व फ्रांसचे 'नागरी विमानन अपघात सुरक्षा चौकशी व पृथक्करण ब्युरो' हे सरकारी खाते यात मदत करेल.[14][15]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.