२००६ आशियाई खेळ
From Wikipedia, the free encyclopedia
२००६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १५वी आवृत्ती कतार देशाच्या दोहा शहरात १ ते १५ डिसेंबर, इ.स. २००६ दरम्यान भरवली गेली. १९७४ मध्ये तेहरान नंतर ह्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळणारे दोहा हे पश्चिम आशियामधील दुसरे शहर होते. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सर्व ४५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.
जलद तथ्य १५वी आशियाई क्रीडा स्पर्धा, यजमान शहर ...
१५वी आशियाई क्रीडा स्पर्धा | |||
---|---|---|---|
यजमान शहर | दोहा, कतार | ||
भाग घेणारे संघ | ४५ | ||
खेळाडू | ९,५२० | ||
खेळांचे प्रकार | ३९ | ||
उद्घाटन समारंभ | १ डिसेंबर | ||
सांगता समारंभ | १५ डिसेंबर | ||
उद्घाटक | शेख हमद बिन खलिफा अल थानी | ||
प्रमुख स्थान | खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम | ||
|
बंद करा