१९५० फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९५० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौथी आवृत्ती ब्राझील देशामध्ये २४ जून ते १६ जुलै १९५० दरम्यान खेळवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धामुळे १९४२ व १९४६ सालच्या स्पर्धा रद्द केल्या गेल्यामुळे १९३८ च्या विश्वचषकानंतर १२ वर्षांनी ही स्पर्धा भरवली गेली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १५ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
जलद तथ्य IV Campeonato Mundial de Futebol, स्पर्धा माहिती ...
IV Campeonato Mundial de Futebol | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | ब्राझील |
तारखा | २४ जून – १६ जुलै |
संघ संख्या | १५ |
स्थळ | ६ (६ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | उरुग्वे (२ वेळा) |
उपविजेता | ब्राझील |
तिसरे स्थान | स्वीडन |
चौथे स्थान | स्पेन |
इतर माहिती | |
एकूण सामने | २२ |
एकूण गोल | ८८ (४ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | १०,४३,५०० (४७,४३२ प्रति सामना) |
← १९३८ १९५४ → | |
बंद करा
उरुग्वेने अंतिम साखळी गटात यजमान ब्राझीलला २–१ असे पराभूत करून दुसरे अजिंक्यपद मिळवले. विजेतेपदासाठी अंतिम फेरीचा सामना न खेळवला गेलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.