![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/68/Hector_International_Airport_-_North_Dakota.jpg/640px-Hector_International_Airport_-_North_Dakota.jpg&w=640&q=50)
हेक्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ
From Wikipedia, the free encyclopedia
हेक्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: FAR, आप्रविको: KFAR, एफ.ए.ए. स्थळसूचक: FAR) अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील फार्गो शहराचा विमानतळ आहे. याला मार्टिन हेक्टरचे नाव दिलेले आहे. हेक्टरने विमानतळासाठीची जागा शहरास दान केली होती.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/68/Hector_International_Airport_-_North_Dakota.jpg/320px-Hector_International_Airport_-_North_Dakota.jpg)
येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही. फार्गो एर नॅशनल गार्ड सुद्धा या विमानतळाचा उपयोग करतात.