![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a8/J%25C3%25BAlio_C%25C3%25A9sar_FC_Internazionale.jpg/640px-J%25C3%25BAlio_C%25C3%25A9sar_FC_Internazionale.jpg&w=640&q=50)
हुलियो सेझार सोआरेस एस्पिंदोला
From Wikipedia, the free encyclopedia
हुलियो सेझार सोआरेस एस्पिंदोला उर्फ हुलियो सेझार (पोर्तुगीज: Júlio César Soares de Espíndola; ३ सप्टेंबर १९७९ (1979-09-03)) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००३ पासून ब्राझील राष्ट्रीय संघामध्ये गोलरक्षक असलेला सेझार २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक, २००३, २००९ व २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक तसेच २००४ व २०११ कोपा आमेरिका ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a8/J%C3%BAlio_C%C3%A9sar_FC_Internazionale.jpg/320px-J%C3%BAlio_C%C3%A9sar_FC_Internazionale.jpg)
क्लब पातळीवर सेझार २००५-१२ दरम्यान इटलीच्या सेरी आ मधील इंटर मिलान तर २०१२ पासून प्रीमियर लीगमधील क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.