हियन कालावधी
From Wikipedia, the free encyclopedia
हियन कालावधी (平安 時代 हेयान जिदाई) ह सन ७९४ ते ११८५ च्या दरम्यानचा हा काळ आहे. हा जपानी पारंपारिक इतिहासाचा शेवटचा विभाग मानला जातो.[1] या कालावधीचे नाव हियन-क्यो, किंवा आधुनिक क्योटोच्या नावावरून ठेवले गेले. जपानी इतिहासातील हा काळ आहे जेव्हा जपानी संस्कृतीत बौद्ध, ताओ धर्म आणि अन्य चिनी प्रभाव त्यांच्या उच्चतम स्तरावर होता. हियन कालावधी जपानी शाही दरबाराचा शिखर देखील मानला जातो आणि तो त्याच्या कलेसाठी, विशेषतः कविता आणि साहित्य यासाठी प्रसिद्ध होता. जपानच्या इम्पीरियल हाऊसच्या हातात जरी सत्ता दिसत असली तरी खरी सत्ता फुजीवारा वंशाच्या ताब्यात होती. फुजीवारा वंश शाही घराण्याचे व्याही होते. बऱ्याच सम्राटांची आई फुजीवाडा कुटुंबातील होती.[2] हियान (平安) शब्दाचा अर्थ जपानी भाषेत “शांती” असा आहे.