हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
From Wikipedia, the free encyclopedia
हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याचा सरकारप्रमुख व विधानसभेचा प्रमुख नेता असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकांद्वारे निवडला जातो व हिमाचल प्रदेशच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ हिमाचल प्रदेश राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे.
जलद तथ्य हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री, शैली ...
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री | |
---|---|
शैली | राज्यसरकार प्रमुख |
सदस्यता | हिमाचल प्रदेश विधानसभा |
वरिष्ठ अधिकारी | हिमाचल प्रदेशचे राज्यपाल |
मुख्यालय | सिमला |
नियुक्ती कर्ता | हिमाचल प्रदेशचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
निर्मिती | ८ मार्च १९५२ |
पहिले पदधारक | यशवंत सिंह परमार |
बंद करा
१९५२ सालापासून एकूण ७ व्यक्ती हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत ज्यापैकी ४ मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.