हाथीगुंफा शिलालेख
ओडिसातील भुवनेश्वर जवळील उदयगिरी येथील हाथीगुंफा येथे इसवी सन पूर्व २ ऱ्या शतकातील कलिंग साम्र / From Wikipedia, the free encyclopedia
हाथीगुंफा शिलालेख हा ओडिसातील भुवनेश्वर जवळील उदयगिरी येथील हाथीगुंफा येथे इसवी सन पूर्व २ ऱ्या शतकातील कलिंग साम्राज्याचा राजा खारवेल याने कोरलेला शिलालेख आहे. उदयगिरी पर्वतराजीमध्ये असलेला हा शिलालेख सात ओळींचा असून मध्य पश्चिम प्राकृत भाषेत ब्राह्मी लिपीत आहे.[1] कलिंग अक्षरलेखन पद्धतीतील वैशिष्ट्यपूर्ण असा हा लेख असून याचा काल १५० इ.स.पूर्व असल्याचे मानले जाते. खारवेल राजाच्या कारकिर्दीच्या १३ व्या वर्षी सदर लेख कोरला गेला असावा असे अभ्यासकांचे मत आहे.[2] ह्या शिलालेखापासून १० कि.मी. अंतरावर सम्राट अशोकाचा धौलीचा शिलालेख आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/30/Udayagiri_Yavana_warrior.jpg/640px-Udayagiri_Yavana_warrior.jpg)