From Wikipedia, the free encyclopedia
स्टार ट्रेक ही अमेरिकेत बनविलेली व विज्ञान कथेवर आधारित अशी एक दूरचित्रवाणी मालिकांची शृंखला आहे.
एकूण ७ दूरचित्रवाणी मालिका मिळूळुन, सर्व स्टार ट्रेकच्या काल्पनिक ब्रह्मांडाची रचना झाली आहे स्टार ट्रेकच्या विश्वासाठी एकूण ७४१ भाग निर्माण करण्यात आले व ते ३१ पर्वामध्ये प्रसारित झाले.
स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज अथवा "टॉस" [1] ही एक मालिका आहे, अमेरिकेतील एन.बी.सी वाहिनी वर ८ सप्टेंबर १९६६ रोजी पहिल्यांदा प्रक्षेपित झाली.[2] ही मालिका यु.एस.एस. एंटरप्राइझ अंतराळ जहाजावरील खलाश्यांच्या विविध अनुभवाबद्दल आहे. त्या सर्वांना ५-वर्षांसाठी एक कामगिरी दिली गेलेली असते, ज्याप्रमाणे त्यांना शोध लावण्यासाठी जेथे मानव जातीने कधीच प्रवास केलेला नाही अशा अंतराळातील अज्ञात प्रदेशात प्रवास करावयाचा असतो' ही मालिका इ.स.१९६६ ते इ.स.१९६९ पर्यंत प्रक्षेपित करण्यात आली. हिच्यामध्ये कॅप्टन जेम्स टी. कर्कच्या भूमिकेत विल्यम शॅटनर, स्पॉकच्या भूमिकेत लिओनार्ड निमॉय, डॉ. लिओनार्ड "बोन्स" मॅकॉयच्या भूमिकेत डिफॉरेस्ट केली, माँटगोमेरी "स्कॉटी 'स्कॉटच्या भूमिकेत जेम्स डोहान, उहूराच्या भूमिकेत निशेल निकोल्स, हिकारू सुलूच्या भूमिकेत जॉर्ज टेकेई आणि पावेल चेकोव्हच्या भूमिकेत वॉल्टर कोइनेग.[3]. ह्या मालिकेला बेस्ट नाटक प्रस्तुतीकरणासाठी २ वेळा ह्यूगो अवॉर्ड (ह्यूगो अवॉर्ड फॉर बेस्ट ड्रामॅटिक प्रेझेन्टेशन) हा पुरस्काराचे नामांकन मिळाले. द मॅनागिरी आणि द सिटी ऑन द एज ऑफ फॉरेव्हर या दोन भागांसाठी या मालिकेला नामांकन मिळाले.[4]
एन.बी.सी ने ही मालिका ३ पर्वांनंतर थांबवली, मात्र शेवटचा भाग ३ जूम १९६९ रोजी प्रक्षेपित केला.[5]
पॅरामाउंट पिक्चर्सने एकूण १३ स्टार ट्रेक चित्रपट तयार केले आहेत, ज्यामध्ये सर्वात नवीन जुलै २०१६ रोजी प्रक्षेपीत झाला.[6] पहिल्या सहा चित्रपटांचे कथानक, स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज कलाकारांच्या प्रवासांचे कथानाक पुढे नेते. सातवा चित्रपट, स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीजच्या कथानकापासून स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनच्या कथानकात संक्मित होतो. पुढील तीन चित्रपट (८-१०), संपूर्णपणे स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनच्या कथानकावर केंद्रित केले आहेत.[7]. अकरावा चित्रपटचे कथानाक संपूर्णपणे नवीन कलाकारांसोबत एका वैकल्पिक ब्रह्मांडा मध्ये घडतो. लिओनार्ड निमॉयने या सर्व चित्रपटांमध्ये वृद्ध स्पॉकची भूमिका केली आहे.
एक प्रचंड ऊर्जा ढग पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करत सर्वत्र विनाश करत येतो. ह्या ढगाला पृथ्वीजवळ पोहचण्याआधी, मध्येच अडवून त्याचा उद्देश काय आहे याचा तपास करून पृथ्वीचा विनाश थांबवायचे.काम यु.एस.एस. एंटरप्राइझला दिले आहे.
खान नूनिएन सिंग (रिकार्डो मॉन्टलबॅन), ज्याला कर्क ने पंधरा वर्षांपूर्वी एंटरप्राइझचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात रोखले होते ("स्पेस सीड" भाग), आता तो अॅडमिरल कर्कचा सूड घेण्यासाठी एक धूर्त आणि भयावह सापळा रचला आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.