सोनाली बेंद्रे (जन्म १ जानेवारी १९७५) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सोनालीने मुख्यतः बॉलीवूडमधे हिंदी सिनेमांत काम केले आहे. याशिवाय काही तेलुगू, मराठी, तमिळ आणि कन्नड सिनेमांतही तिने काम केलेले आहे. आग (१९९४) मधून तिच्या अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी तिने मॉडेलिंग केले होते. आग चित्रपटासाठी तिला फिल्मफेर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.[1][2][3] बेंद्रे ही दोन फिल्मफेअर पुरस्कार आणि चार स्क्रीन पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांचे प्राप्तकर्ता आहेत.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
स्थानिक भाषेतील नाव | Sonali Bendre | ||
जन्म तारीख | जानेवारी १, इ.स. १९७५ मुंबई | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
मातृभाषा | |||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
|
बेंद्रे यांनी दिलजले (१९९६), मेजर साब (१९९८), सरफरोश (१९९९)[4] आणि हम साथ साथ हैं (१९९९) यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केली होती. हमारा दिल आपके पास है (२०००) मधील तिच्या अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा स्क्रीन अवॉर्ड मिळाला. बेंद्रे यांनी तमिळ चित्रपट कादलार धिनम (१९९९) आणि तेलुगू चित्रपट मुरारी (२००१) मध्ये देखील काम केले आहे. मुरारी चित्रपटासाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तेलुगू फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळवले. तिच्या इतर यशस्वी तेलुगू चित्रपटांमध्ये इंद्र, खडगम, मनमधुडू (सर्व २००२) आणि शंकर दादा एमबीबीएस (२००४) यांचा समावेश आहे. त्यानंतर बेंद्रे यांनी अनाहत (२००३) या मराठी चित्रपटात काम केले.[5] २००४ च्या अगं बाई अरेच्चा! मराठी चित्रपाटात ती "चम चम करता" या आयटम डान्स मध्ये देखील दिसली.
यानंतर काही काळ अभिनयाला विराम घेउन ती इंडियाज गॉट टॅलेंट आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाज यांसारख्या विविध रिॲलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली आहे. नंतर, बेंद्रे यांनी अजीब दास्तान है ये (२०१४) आणि द ब्रोकन न्यूज (२०२२) या दूरचित्रवाणी मालिकेत काम केले. तिच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच, बेंद्रे ही अनेक वस्तुंची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तिने चित्रपट निर्माते गोल्डी बहलशी लग्न केले आहे ज्यांना एक मुलगा आहे.
वैयक्तिक जीवन
सोनाली बेंद्रेंचा जन्म १ जानेवारी १९७५ साली मुंबईमधे एका महाराष्ट्रीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला.[6][7] तिला दोन बहिणी आहेत. तिचे वडील नागरी सेवक होते.[8] तिने तिचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय, बंगलोर येथून पूर्ण केले आणि मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.[9]
बेंद्रे व चित्रपट निर्माता गोल्डी बहल यांची पहिली भेट त्यांच्या नाराझ चित्रपटाच्या सेटवर झाली.[10][11] गोल्डी हा दिग्दर्शक रमेश बहल यांचा मुलगा आहे. सोनालीचे १२ नोव्हेंबर २००२ रोजी गोल्डी बहलशी यांच्याशी मुंबईत लग्न झाले.[12]. ११ ऑगस्ट २००५ ला सोनालीने एका मुलाला (नाव - रणवीर) जन्म दिला.[13]
जुलै २०१८ मध्ये बेंद्रेनी जाहीर केले की, तिला मेटास्टॅटिक कर्करोगाचे निदान झाले आहे आणि न्यू यॉर्क शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.[14] चौथ्या स्टेजचा कर्करोग असूनही, अभिनेत्री २०२१ मध्ये कर्करोगमुक्त झाल्याचे कळवले.[15]
वाद
१९९८ मध्ये, बेंद्रे यांच्यावर सहकलाकार सलमान खान, सैफ अली खान, तब्बू आणि नीलम कोठारी यांच्यासह राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील कांकणी गावाच्या बाहेरील भागात दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता.[16] कनिष्ठ न्यायालयाने तिच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत आरोप लावले.[17] न्यायालयाच्या विविध वादानंतर, बेंद्रे यांची ५ एप्रिल २०१८ रोजी काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.[18][19]
सार्वजनिक प्रतिमा
बेंद्रे यांना बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखले जाते.[20][21] न्यूझ१८ इंडियाने तिला "बॉलिवुडची गोल्डन गर्ल" असे संबोधले आहे.[22] २००७ मध्ये रेडिफ.कॉम ने "बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्री" या यादीत तिचा समावेश केला होता.[23]
२०१५ मध्ये, बेंद्रे यांनी "द मॉडर्न गुरुकुल: माय एक्सपेरिमेंट विथ पॅरेंटिंग" नावाचे एक पुस्तक लिहिले, जे प्रथमच आई म्हणून तिच्या कर्तृत्त्व आणि आव्हानांबद्दल बोलते.[24] बेंद्रे २०१६ च्या फोर्ब्स इंडिया मासिकाच्या "सेलिब्रिटी १००" यादीत ९९ व्या क्रमांकावर दिसली व तिचे अंदाजे वार्षिक उत्पन्न ६५ दशलक्ष (US$१.४४ दशलक्ष) होते.[25] २०१८ मध्ये, बेंद्रे ही पाकिस्तानमधील गुगल वर सर्वाधिक शोधले गेलेले व्यक्तिमत्त्व होती.[26]
संदर्भ
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.