सदस्य चर्चा:अभय नातू/sureshkhole यांचा महिला सुरक्षिततेबद्दलचा आरोप
From Wikipedia, the free encyclopedia
सदस्य sureshkhole यांनी मराठी विकिपीडियावर महिला सुरक्षित नसल्याचा आरोप येथे केलेला आहे. हा विषय गंभीर असू शकतो. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी हे विशेष पान तयार केले आहे.
उपरोल्लेखित चर्चा वाचली असता लक्षात येईल की ही चर्चा लेखनातील एका विशिष्ट सदस्याकडून होणाऱ्या व्यत्ययाबद्दलच्या तक्रारीपासून सुरू झाली व नंतर ती प्रताधिकारभंग, महिला सुरक्षितता, प्रचालकांवर आरोप आणि असंबद्ध मुद्द्यांवरुन व्यक्तिगत हल्ले यांच्यात अडकली. इतर सगळे मुद्दे बाजूला ठेवून मराठी विकिपीडियावर महिला सुरक्षित आहेत कि नाही यावर येथे लिहीत आहे.
येथे सुरक्षितता या शब्दाचा दोन प्रकारे अर्थ लावता येतो -
- मराठी विकिपीडियावर योगदान करताना इतरांचा व्यत्यय होउन त्यामुळे अनकम्फर्टेबल वाटणे आणि/किंवा योगदान करण्याचा उत्साह कमी व्हावा.
- शाब्दिक किंवा शारिरीक इजा करणे किंवा करण्याच्या धमक्या देणे आणि/किंवा असे होऊ शकते असा समज निर्माण करणे.
- मराठी विकिपीडियावरील जुन्या सदस्यांना आठवत असेल की काही वर्षांपूर्वी उत्पाती सदस्याने एका प्रचालकाचा पत्ता काढून तो येथे जाहीरपणे लावला होता व तेथे येउन जाब विचारतो आणि बघून घेतो या अर्थाचा संदेश दिला होता. हा प्रकार #२ मध्ये मोडतो..