भारतीय अभिनेत्री From Wikipedia, the free encyclopedia
शेनाझ ट्रेझरीवाला (जन्म २९ जून १९८१) [1] ह्या एक भारतीय अभिनेत्री आणि ट्रॅव्हल व्लॉगर आहेत.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून २९, इ.स. १९८१ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
|
महाविद्यालयात असताना त्यांचे पहिली मॉडेलिंग काम हे शीतपेय गोल्ड स्पॉटसाठी होते.[2] एमटीव्ही नेटवर्क एशियाने त्यांना एमटीव्ही मोस्ट वॉन्टेड कार्यक्रमात व्हीडीयो जॉकी म्हणून कामावर घेण्यापूर्वी अकाई आणि फिलिप्ससाठी जाहिरातींचे काम देखील त्यांनी केले होते.[2][3]
२००१ च्या तेलुगू चित्रपट एदुरुलेनी मनिषी मध्ये त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली.[4] मुंबईच्या एका नाईट क्लबमध्ये दिग्दर्शक केन घोष यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी इश्क विश्कमध्ये मुख्य भूमिकेची स्वीकार केला.[5][6] ह्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड्सद्वारे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळवून दिले.[7] त्यांच्या प्रवासाच्या प्रेमामुळे त्यांनी कॉस्मोपॉलिटन, एले आणि फेमिना साठी प्रवासवर्णनाचे लेख लिहिले आहेत.[3][6][8] २०१० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, ट्रेझरीवाला मुंबई येथे राहत होत्या आणि ट्रॅव्हल चॅनेलवर कल्चर शॉकचे यजमान म्हणून काम करत होत्या.[8] २०११ मध्ये, त्यांनी अमेरिकन टीव्ही मालिका वन लाइफ टू लिव्हमध्ये रमा पटेल म्हणून आवर्ती भूमिका मिळावली. काही महिन्यांनंतर, त्यांनी २०१२ मध्ये शो रद्द होईपर्यंत हे काम केले आणि नंतर २०१३ मध्ये शोचे वेबिसोड प्रसारित करण्यास सुरुवात केली तेव्हा त्या भूमिका बजावण्यास परतल्या.[9]
२००९ मध्ये त्या आगे से राईट आणि रेडिओ या चित्रपटांमध्ये दिसल्या. त्यांनी २०११ च्या लव का द एंड या चित्रपटासाठी पटकथा लिहिली आणि अभिनय देखील केला. दिल्ली बेली व मैऔर मिस्टर राइट चित्रपटातही त्यांनी काम केले. २०१५ दरम्यान, त्या युनायटेड स्टेट्समधील कॉमेडी सेंट्रलवरील द नाईटली शो विथ लॅरी विल्मोर मध्ये त्या अधूनमधून पॅनेलिस्ट होत्या.[10]
२०१७ मध्ये, त्या समीक्षकांनी प्रशंसित इंडी चित्रपट द बिग सिकमध्ये दिसल्या जिथे त्यांनी कुमेल नानजियानीच्या वहिनीची भूमिका केली होती. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांनी महिला स्पेशल रेसलिंग कार्यक्रमाचे संयोजन देखील केले आहे.[11] अभिनयासोबतच त्या आता यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर ट्रॅव्हल व्लॉग शेअर करातात.[12]
ट्रेझरीवालांचे वडील व्यापारी सागरी अभियंता होते [8] आणि त्यांचा जन्म एका पारशी कुटुंबात झाला होता. ट्रेझरीवाला यांनी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयात (सेंट झेवियर्स कॉलेज) येथे शिक्षण घेतले.[8][2] २००१ मध्ये, त्या न्यू यॉर्क शहरात गेल्या जिथे त्यांनी ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनय पद्धतीचा अभ्यास केला.[13] न्यू यॉर्कमध्ये असताना त्यांनी न्यू यॉर्क विद्यापीठ येथे लेखनाचा अभ्यासक्रमही घेतला.[13]
डिसेंबर २०१४ मध्ये दिल्लीतील एका उबर चालकाने केलेल्या बलात्कार नंतर शेनाझ ट्रेझरीवाला यांनी नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि अनिल अंबानी यांच्यासह भारतातील अनेक शक्तिशाली लोकांना एक खुले पत्र लिहिले व महिलांच्या सुरक्षेवर भाष्य केले. त्यात त्यांनी भारतीय महिलांच्या सुरक्षेसाठी या कारणाविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली.[14][15][16][17]
वर्ष | शीर्षक | भूमिका | नोट्स |
---|---|---|---|
२००१ | एदुरुलेनी मनीषी | श्री | तेलुगु चित्रपट |
२००३ | इश्क विश्क | अलिशा सहाय | |
२००४ | हम तुम | शालिनी | |
२००६ | उमर | सपना पी. लाखा | |
२००९ | आगे से राइट | मोती | |
रेडिओ | शनाया धिंग्रा | ||
२०११ | लव का द एंड | कु. नाझ | |
दिल्ली बेली | सोनिया मेहरा | ||
२०१४ | मैं और मिस्टर राईट | आलिया | |
२०१७ | द बिग सिक | फातिमा | |
मुन्ना मायकल | अँकर | ||
२०१८ | काळकांडी | आयशा | |
२०२१ | अमेरिकनिश | अमिरा | इंग्रजी चित्रपट |
वर्ष | शीर्षक | भूमिका |
---|---|---|
२००७ | कल्चर शॉक | स्वतः / यजमान |
२०११-१३ | वन लाइफ टू लिव्ह | रमा पटेल |
२०१५ | द नाईटली शो विथ लॅरी विल्मोर | योगदानकर्ता |
२०१६ | ब्राउन नेशन | डिंपल पारीख |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.