![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Shivaji_British_Museum.jpg/640px-Shivaji_British_Museum.jpg&w=640&q=50)
शिव स्मारक
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मुंबई / From Wikipedia, the free encyclopedia
शिव स्मारक किंवा छ. शिवाजी महाराज स्मारक हे मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ मुंबईत बनवले जाणारे एक स्मारक आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगांव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आधारासह एकूण उंची २१२ मीटर असणार आहे. चीनमधील २०८ मीटर उंचीच्या स्प्रिंग टेंपल बुद्धापेक्षा याची उंची वाढवण्यात आली आहे.[1] या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Shivaji_British_Museum.jpg/640px-Shivaji_British_Museum.jpg)