विशाळगड
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला / From Wikipedia, the free encyclopedia
विशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विशाळगड | |
विशाळगडावरील एक संरचना | |
नाव | विशाळगड |
उंची | 1130 मीटर |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी. |
ठिकाण | कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | विशाळगड,कोल्हापूर |
डोंगररांग | सह्याद्री |
सध्याची अवस्था | बिकट* |
स्थापना | {{{स्थापना}}} |
विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.
किल्ले विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरित्याच दुर्गमतेच कवच लाभल आहे. हा प्राचीन किल्ला अणुस्कुरा घाट व आंबा घाट, या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था उद्वीग्न करणारी आहे. इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे.