![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9f/Bastions_of_vijaydurg.jpg/640px-Bastions_of_vijaydurg.jpg&w=640&q=50)
विजयदुर्ग
महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण किनारपट्टीवरचा जलदुर्ग / From Wikipedia, the free encyclopedia
विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे.[1]
जलद तथ्य
विजयदुर्ग किल्ला | |
![]() | |
गुणक | 16.5607°N 73.3334°E / 16.5607; 73.3334 |
नाव | विजयदुर्ग किल्ला |
उंची | 100 |
प्रकार | जलदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | देवगड, महाराष्ट्र |
जवळचे गाव | विजयदुर्ग |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | ११९३ |
बंद करा
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a5/Entrance_of_Fort_Vijaydurga.jpg/640px-Entrance_of_Fort_Vijaydurga.jpg)
विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.