ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो किंवा ज्या ठिकाणी नेहमी अतिवृष्टी होत असते अशी भौगोलिक रचना From Wikipedia, the free encyclopedia
वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.
वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते.
उष्ण वाळवंटे
वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण ते शीत या पट्ट्यात येते.
वैशिष्ट्ये
सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.
भौगोलिक वैशिष्ट्ये
वाळूने व्यापलेला प्रदेश. वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या