![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d7/Blacksmith_MH_India.jpg/640px-Blacksmith_MH_India.jpg&w=640&q=50)
लोहार
From Wikipedia, the free encyclopedia
लोहार (इंग्लिश: Blacksmith, ब्लॅकस्मिथ) म्हणजे लोखंडाच्या वस्तू घडवणारे कारागीर होत. तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून ठोकून लोहार वस्तूस आकार देतात. साधारणपणे, ते शेतीची / बागकामाची अवजारे उदा. विळे, कोयते, खुरपी, बांधकामासाठी लागणारी साधने, जाळ्या, सळया, भांडी, प्राण्यांच्या खुरांना ठोकायचे नाल, शस्त्रे, बैलगाडीच्या चाकाना लोखंडी धाव, पाण्याच्या मोटी, नांगराचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी, घमेली, खिडक्यांचे गज इत्यादी लोखंडी वस्तू बनवतात.लोहार ही भारतातील एक प्रमुख व्यावसायिक जात आहे. जातीच्या आधारावर लोहार मागासवर्गात येतो. लोखंडी शिल्प - लोहार हा ब्राह्मण आहे.अथर्ववेदिक विश्वकर्माला ब्राह्मण म्हणतात.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d7/Blacksmith_MH_India.jpg/640px-Blacksmith_MH_India.jpg)
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/f/f9/Kov%C3%A1%C5%99_p%C5%99i_pr%C3%A1ci_%28Velikono%C4%8Dn%C3%AD_trhy_na_V%C3%A1clavsk%C3%A9m_n%C3%A1m%C4%9Bst%C3%AD%29_055.jpg/640px-Kov%C3%A1%C5%99_p%C5%99i_pr%C3%A1ci_%28Velikono%C4%8Dn%C3%AD_trhy_na_V%C3%A1clavsk%C3%A9m_n%C3%A1m%C4%9Bst%C3%AD%29_055.jpg)
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d6/Indian_sickle.png/640px-Indian_sickle.png)