लाऊआर नदी
From Wikipedia, the free encyclopedia
लाऊआर (फ्रेंच: Loire) ही फ्रान्स देशातील सर्वात लांब नदी आहे. एकूण १,०१२ किमी लांबी असलेली ही नदी दक्षिण फ्रान्सच्या डोंगराळ भागात उगम पावते, फ्रान्सच्या मध्य व पश्चिम भागामधून वाहते व अटलांटिक महासागराला मिळते.
जलद तथ्य लाऊआर नदी, उगम ...
लाऊआर नदी | |
---|---|
मेन-एत-लावारमध्ये लाऊआर नदीचे पात्र | |
उगम | सेंत युलेली, आर्देश 44°49′48″N 4°13′20″E |
मुख | बिस्केचे आखात, अटलांटिक महासागर 47°16′9″N 2°11′9″E |
पाणलोट क्षेत्रामधील देश | फ्रान्स |
लांबी | १,०१२ किमी (६२९ मैल) |
उगम स्थान उंची | १,४०८ मी (४,६१९ फूट) |
सरासरी प्रवाह | ८३५.३ घन मी/से (२९,५०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १,१७,००० |
बंद करा
लाऊआर नदीच्या खोऱ्याला फ्रान्सची बाग असे म्हणले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर वाईन बनवली जाते. येथील निसर्गसौंदर्यासाठी लाऊआर खोऱ्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.