From Wikipedia, the free encyclopedia
ऱ्होड आयलंड (इंग्लिश: Rhode Island; उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले ऱ्होड आयलंड लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४३व्या क्रमांकाचे व दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.
ऱ्होड आयलंड Rhode Island | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | प्रॉव्हिडन्स | ||||||||||
मोठे शहर | प्रॉव्हिडन्स | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ५०वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ३,१४० किमी² | ||||||||||
- रुंदी | ७१० किमी | ||||||||||
- लांबी | १९५ किमी | ||||||||||
- % पाणी | १३.९ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ४३वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १०,५३,२०९ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ३९०.८/किमी² (अमेरिकेत २वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $५४,६१९ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २९ मे १७९० (१३वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-RI | ||||||||||
संकेतस्थळ | www.ri.gov | ||||||||||
ऱ्होड आयलंडच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला कनेटिकट, उत्तरेला व पूर्वेला मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. राज्याच्या नैऋत्येला खाडीपलिकडे न्यू यॉर्क शहराचे लाँग आयलंड हे बेट आहे. प्रॉव्हिडन्स ही ऱ्होड आयलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ऱ्होड आयलंडच्या एकूण क्षेत्रफळाच्या १४ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.