![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/db/20180602_FIFA_Friendly_Match_Austria_vs._Germany_Jogi_L%25C3%25B6w_850_1386_%2528cropped%2529.jpg/640px-20180602_FIFA_Friendly_Match_Austria_vs._Germany_Jogi_L%25C3%25B6w_850_1386_%2528cropped%2529.jpg&w=640&q=50)
योआखिम ल्योव
From Wikipedia, the free encyclopedia
योआखिम ल्योव (जर्मन: Joachim Löw; ३ फेब्रुवारी १९६० (1960-02-03), श्योनाउ, पश्चिम जर्मनी) हा एक माजी जर्मन फुटबॉलपटू व जर्मनी राष्ट्रीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक आहे. २००४-०६ दरम्यान जर्मन संघाचा उप-प्रशिक्षक असलेला ल्योव २००६ पासून प्रशिक्षकपदावर आहे. त्याने आजवर २००६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो २००८, २०१० फिफा विश्वचषक, युएफा यूरो २०१२, २०१४ फिफा विश्वचषक व युएफा यूरो २०१६ ह्या प्रमुख स्पर्धांमध्ये जर्मनीच्या प्रशिक्षकाचे काम पाहिले आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/db/20180602_FIFA_Friendly_Match_Austria_vs._Germany_Jogi_L%C3%B6w_850_1386_%28cropped%29.jpg/640px-20180602_FIFA_Friendly_Match_Austria_vs._Germany_Jogi_L%C3%B6w_850_1386_%28cropped%29.jpg)
जर्मनीच्या प्रशिक्षकपदापूर्वी ल्योव फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट, फेनर्बाचे एस.के., कार्ल्सरुहेर एस.से. इत्यादी क्लबांचा प्रशिक्षक राहिला आहे.